घोडाझरी तलाव परिसर स्वाब संस्थेने केला प्लास्टिक मुक्त.
घोडाझरी तलाव परिसर स्वाब संस्थेने केला प्लास्टिक मुक्त.
( प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान अंतर्गत स्वच्छता मित्रांनी राबविली मोहीम.)
नागभिड:
संपूर्ण परिसरात पर्यटनासाठी अत्यंत प्रसिद्ध असलेला घोडाझरी तलाव येथे पावसाळ्याच्या दिवसात लाखो पर्यटक येतात. मात्र बाहेरून येणारे पर्यटक हे जंगलालगत किंवा जंगलात जाऊन पार्ट्या करतात त्यामुळे तेथेच प्लास्टिक पत्रावळी, प्लास्टिकचे ग्लास , पाण्याच्या बॉटल, फेकत असतात. हा विखुरलेला मुख्य गेट ते तलाव परिसरापर्यंतचा रस्ता परिसरातील प्लास्टिक बॉटल, प्लास्टिकच्या पिशव्या, कुरकुरेच्या पिशव्या, असा प्लास्टिक कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक मुक्त केला.
मात्र परिसरामध्ये पर्यावरणाकरता झटणारी व पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे काम करणारी 'स्वाब संस्था' पर्यावरणात विखुरलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे पर्यावरणाचे व वन्यजीवांचे नुकसान लक्षात घेत. येत्या सात ते आठ वर्षापासून सतत आपल्या परिसरातील जंगल परिसरातील रस्ते, धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ, तलाव, डोंगर परिसर हे त्या परिसरात पडलेला प्लास्टिकचा कचरा गोळा करून स्वच्छ करण्याचे काम ही स्वाब संस्था 'प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान' राबवून श्रमदानातून करीत असते. व वर्षातून परिसरातील प्रत्येक जंगला लगतचे स्थळ हे तीनदा प्लास्टिक मुक्त करीत असते. याच संदर्भाने 'स्वाब नेचर केयर 'संस्थेच्या वतीने घोडाझरी अभयारण्याचा मुख्य गेट ते तलाव परिसरापर्यंत पाच ते सात किलोमीटरचा अंतर पैदल चालून, तसेच तलाव परिसरातील ओवर फ्लो चा संपूर्ण परिसर पिंजून काढीत घोडाझरी परिसरातील प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पत्रावळी , प्लास्टिक ग्लास, प्लास्टिकच्या पिशव्या, शेकडो दारु बॉटल्स, खऱ्याच्या पन्या, असा मोठ्या प्रमाणात परिसरात पसरलेला प्लास्टिकचा कचरा गोळा करून संपूर्ण तलाव परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आले.
यावेळी स्वाब नेचर केअर संस्था चे यश कायरकर, जिवेश सयाम, नितिन भेंडाळे, शुभम निकेशर,शरद गभने, जीवन गुरनुले, सुमित गुरनुले, गिरीधर निकुरे, महेश बोरकर, कैलास बोरकर, साहिल सेलोकर, अनमोल सेलोकर, गणेश गुरनुले, आदित्य नान्हे, आदित्य आंबोरकर,तर संस्थेच्या महिला स्वच्छता मैत्रीणी मंजुषा घुगुस्कर, अर्चना आंबोरकर, अपूर्वा मेश्राम, प्रविना रामटेके तर वन विभागचे वनरक्षक सी.एस. कुथे, यांनी राबविण्यात आलेल्या प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियानाला मोलाचं सहकार्य केले.
नागभीड च्या वनपरिक्षेत्र अधिकारी कु. भारती बगमारे, यांची परवानगी घेऊन ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!