पुराच्या पाण्यात वाहून गेला शेतकरी

बोरगाव धांडे येथील घटना

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोरगाव धांडे येथील शेतकरी शेताकडे जात असताना पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.मागील दोन दिवसापासून पडत असलेल्या सततधार पावसाने काही ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली असुन तर शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोरगाव धांडे येथील शेतकरी पत्रु गंगाराम ठावरी वय ४० वर्ष शेताकडे जात असताना बंधाऱ्यातील नाल्यात पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेला असून त्याचा मृत्यू झालेले आहे, याची माहिती पोलीस पाटील यांनी शेगाव पोलीस स्टेशनला दिली असता शेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होत शोध मोहीम सुरू करत नाल्यातून मृत व्यक्तीला काढण्यात आले सदर प्रेत उत्तरणी तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा या ठिकाणी पाठविण्यात आले असून घटनेचा अधिक तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!