जामगाव ( को ) ग्राम पंचायत ला मिळाला जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट प्रथम पुरस्कार
नेरी - प्रतिनिधी ( शुभम बारसागडे )
नेरी : - महाआवास अभियान २०२४-२५ अंतर्गत जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम पुरस्कार जामगाव (को ) ग्रामपंचायतीला मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, नागपूर विभाग शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन जामगाव ( को ) ग्रामपंचायतला गौरविण्यात आले आहे.
जामगाव (को) ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजनेअंतर्गत जवळपास मंजूर १०० टक्के घरकुलांचे काम प्रगतीपथावर नेऊन पूर्णत्वास करण्याची वाटचाल सुरू केली आहे. तसेच गावामध्ये बरेचसे विकासकामे सुरू असून पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी ग्रामपंचायत अधिकारी भास्कर सोनवाने, सरपंच प्रेमीला रामचंद्र ढगे, उपसरपंच जगदीश बोबडे, सदस्य सचिनकुमार बोरकर सर्व सदस्यगण तथा ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सहकार्यातून विकामेकामे केली जात आहे. याची दखल घेत १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सोहळ्यात जामगाव (को) ग्रामपंचायत ला जिल्हास्तरीय सर्वात्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम क्रमांकाने मानाची ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी भास्कर सोनवाने यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सदर पुरस्कार स्वीकारला. तसेच दि. १८ ऑगस्ट ला पंचायत समिती चिमूर संवर्ग विकास अधिकारी नितीन फुलझले यांच्या वतीने जामगाव (को) ग्राम पंचायत संपूर्ण टीम चे सत्कार करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!