सर्पदंशाने चारगाव बु येथील महिलेचा मृत्यू
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यात येत असलेल्या चारगाव बु. येथे कलावती संतोष बावणे वय वर्ष ३५ या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दिनांक १७ ऑगस्ट दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.शेगाव बु येथून जवळच असलेल्या चारगाव बु येथील महिला कलावती संतोष बावणे ही नियमितपणे शेतातून शेतीची कामे आटपून आपल्या राहत्या घरी आल्यावर चाय बनवण्यासाठी गेली असता तिथं दडून असलेल्या सापाने त्या महिलेच्या तळ हाताला चावा घेतल्याने लक्षात आले.यावेळी कसलाही विलंब न करता त्या महिलेला उपजिल्हा रुग्णालयात वरोरा येथे हलविण्यात आले यावेळी तिथून त्यांना जिल्हा रुग्णालय चंद्रपुर येथे हलविण्यात आले. यावेळी महिलेला उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.सदर महिलेच्या मृत्यूमुळे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर महिलेला एक मुलगा एक मुलगी लहान मुले असून आईच्या मृत्यूने मुलांचे छत्र हरपले आहे.सर्पदंश टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आवश्यक असून सदर महिलेस आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!