पिंपळनेरी नवीन वस्ती येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात संपन्न

काँग्रेस पक्षा तर्फे बालगोपालांना कंपॉस पेटी व खाऊचे वाटप 

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक. २३/०८/२०२५ पिंपळनेरी नवीन वस्ती येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही तान्हा पोळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तान्हा पोळा हा बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लहान मुले लाकडी बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढतात. मोठ्या बैलांना हाताळू न शकणाऱ्या मुलांसाठी हा सण खास असून, त्यांच्या उत्साहासाठी आणि हौसेसाठी हा 'तान्हा पोळा' भरवला जातो.प्रत्येक राजकीय पक्षाच्या पदाधिकारी तथा समाजसेवक यांचेकडून बालगोपालांना बक्षीस वितरण करून खाऊंचे वाटप केले जाते. अशातच चिमूर शहर काँग्रेस पक्षातर्फे बालगोपालांना कंपॉस पेटी व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष अविनाश अगडे यांचे मार्गदर्शनात चंदू मडकवार,विलास मोहिणकर,अनिल राऊत, शार्दूल पचारे व समस्त गावकरी बांधवानी सहकार्य करून उपस्थिती दर्शविली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!