दिव्यवंदना आधार फाउंडेशन जामगाव तर्फे बेवारस मृतदेहाचा मुस्लिम कब्रस्थान कमिटी, चिमूर कडून रितीरिवाजाणे केली अंत्यविधी
शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )
चिमूर : - दिव्यवंदना आधार फाउंडेशन जामगाव मधील बेवारस मृतदेहाचा मुस्लिम कब्रस्थान कमिटी, चिमूर कडून रितीरिवाजाणे आंघोळ करून नमाज अदा करून अत्यविधी पार पारडण्यात आली.दिव्यवंदना आधार फाउंडेशन द्वारा संचालित रोडवरील बेघर , निराधार , अनाथ ,मनोरुगण पुनर्वसन केंद्र जामगाव येथे गेल्या आठ महिन्यापासून इब्राहिम शेख नामक व्यक्ती राहत होते. त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मुस्लिम रीती रिवाजानुसार मुस्लिम कब्रस्थान कमिटी कडून अंतिम दफन विधी पूर्ण करण्यात आली. यावेळी मुस्लिम कब्रस्थान कमिटी व दिव्यवंदना आधार फाउंडेशन अध्यक्ष शुभम पसारकर यांच्या उपस्थितीत मुस्लिम कब्रस्थान कमिटीचे अध्यक्ष इरफानभाई , अफरोजभाई शेख , फारुकभाई शेख , हाजीप अनिस शेख , आरीफभाई शेख, हाजी महेबुब मामू, बबलुभाई शेख, रुस्तम पठाण काका ,जावेद पठाण ,हाजी बाबाभाई शेख ,शानू शेख ,गोलू पठाण , पप्पूभाई शेख असे अनेक मुस्लिम समाज व चिमुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यावेळी उपस्थितीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!