पवनी तालुक्यात महसूल विभाग संबंधित विविध कार्यक्रमाचे आयोजन

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबधीत व इतर विभागाशी संबधीत दैनंदिन प्रश्नांचे निराकरण व  जनतेच्या तक्रारी निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमूख , कार्यक्षम, गतिमान करण्याकरीता दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी  साझा  रनाळा  ता. पवनी  येथे रनाळा, निघ्वी व सेंद्री बुज या गावाकरीता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबीरचे आयोजन श्रीमती माधुरी तिखे, उपविभागीय अधिकारी भंडारा व पी. आय राऊत, तहसिलदार पवनी यांना संयुक्त विद्यमानाने करण्यात आले.सदर महाराजस्व अभियान करीता तालुका पवनीतील, तहसिल कार्यालय पवनी (महसूल विभाग,) तालुका कृषी विभाग, पंचायत समिती पवनी, आरोग्य  विभाग, उपअधिक्षक भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, पुरवठा विभाग, निवडणूक विभाग- आधार केंद्र संचालक, ग्रामपंचायत  केंद्र संचालक, ग्रा प रनाळा, शिक्षण विभाग,  संजय गांधी निराधार विभाग पवनी सार्वजनिक बांधकाम विभाग पवनी  येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.सदर शिबीरामध्ये आधार अपडेशन- 10 ॲग्रीस्टँक नोंदणी -6,  पेंडींग ekyc,2  श्रावण बाळ व संगायो निराधार लाभार्थ्यांची डिबीटी,- 12, संगायो अर्ज प्राप्त – 2, आरोग्य तपासणी- 41, घरकुल लाभार्थी मार्गदर्शन, पी. एम किसान योजना -6, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना – 3  ग्रामपंचायत रनाळा यांचेकडून विविध विषयाबाबत 4 निवेदन प्राप्त ,  शासकीय रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळे संबधी 2 प्रस्ताव प्राप्त झालेले, स्वामीत्व योजना अंतर्गत सनद वाटप -1, जिवंत 7/12 फेरफार -1,  उत्पन्न दाखले- 13,  7/12 व 8अ 15 , नविन मतदार नोंदणी 8 अर्ज  प्राप्त व विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. तसेच निघ्वी येथील स्मशान भूमीच्या रस्त्याच्या दोन्ही कडेला दुतर्फा वृक्षलागवड भिमटे सरपंच निघ्वी, मेंढे, उपसरपंच निघ्वी, पी, आय राऊत तहसिलदार पवनी, किशोर राऊत, शुभदा धुर्वे, नायब तहसिलदार पवनी, नितेश माने, गट विकास अधिकारी पं स पवनी, यांचे हस्ते करण्यात आले.मौजा – रनाळा येथील शिबीराकरीता प्रमोदजी डोये, सरपंच रनाळा, भिमटे, सरपंच निघ्वी, मती चिचमलकर, सरपंच सेंद्री बुज , पी.आय राऊत तहसिलदार पवनी, किशोर राऊत, शुभदा धुर्वे, नायब तहसिलदार पवनी,  श्रीमती अर्चना शहारे, निरीक्षण अधिकारी, नितेश माने, गट विकास अधिकारी पं स पवनी, तोवर, दुयम निबंधक, पवनी, बोरकर, मंडळ अधिकारी,  कु समिक्षा उपासे व कु. आरती पोतदार  तलाठी , विनोद मेंढे, कोतवाल व सर्व विभागाचे कर्मचारी हे उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!