बल्लारपूर शहरात पोलिसांचा रूट मार्च


बल्लारपूर शहरात पोलिसांचा  रूट मार्च




बल्लारपूर, दि. 19 ऑगस्ट 2025 :
बल्लारपूर शहरात येणाऱ्या पोळा, तान्हापोळा, गणेश उत्सव तसेच ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिस विभागाकडून भव्य रूट मार्च काढण्यात आला.

हा रूट मार्च आज दुपारी 4:30 वाजता (16/30) पोलिस ठाणे बल्लारपूर येथून सुरू झाला. नगर परिषद चौक, रेल्वे चौक, जुना बस स्टॅन्ड, फॉरेस्ट गेट, गौरक्षण वॉर्ड अशा प्रमुख व गजबजलेल्या मार्गावरून हा रूट मार्च काढण्यात आला. त्यानंतर परतीच्या मुख्य मार्गाने जात सायंकाळी 6 वाजता (18/00) पोलिस ठाणे बल्लारपूर येथे याचा यशस्वी समारोप करण्यात आला.

या रूट मार्चमध्ये 7 अधिकारी व 50 अंमलदार सहभागी झाले होते. संपूर्ण रूट मार्चदरम्यान पोलिसांचे शिस्तबद्ध पथक तैनात होते. शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी रूट मार्चचे स्वागत केले.

पोस्टे बल्लारपूरचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. आगामी सण काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच नागरिकांनी निर्धास्तपणे सण साजरे करावेत, यासाठी पोलिस प्रशासन सदैव सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!