राष्ट्रवादी शहराध्यक्ष आकाश येसनकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणासाठी गरजू विद्यार्थिनीला सायकल भेट– समाजकारणातून दिला जनतेशी नाळ जुळवण्याचा संदेश"

राष्ट्रवादी शहराध्यक्ष आकाश येसनकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षणासाठी गरजू विद्यार्थिनीला सायकल भेट– समाजकारणातून दिला जनतेशी नाळ जुळवण्याचा संदेश"

मुल (प्रतिनिधी):
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष *आकाश येसनकर* यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा करत यंदाही गरजूंच्या जीवनात आनंदाचे क्षण पेरले.

24 ऑगस्ट रोजी वार्ड क्रमांक 15 येथील *नवभारत कन्या शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी महेश्वरी चौधरीला* त्यांनी सायकल भेट दिली. काही महिन्यांपूर्वीच महेश्वरीच्या वडिलांचे अपघातात निधन झाले असून घरची जबाबदारी आईच्या खांद्यावर आली आहे. आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते, मात्र घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने मुलीचे शिक्षण सुरू ठेवणे आव्हान ठरत होते.

दररोज शाळा लांब असल्याने प्रवास कठीण जात होता. ही अडचण लक्षात घेऊन शहराध्यक्ष आकाश येसनकर यांनी पुढाकार घेत तिच्या शैक्षणिक प्रवासासाठी सायकल भेट दिली. या मदतीमुळे महेश्वरीला शिक्षण अधिक सोयीस्कर होणार असून आईवरील भारही काही प्रमाणात हलका होणार आहे.

याआधीही आकाश येसनकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृद्धाश्रमात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, तसेच विधवा महिलेला शिलाई मशीन भेट देणे असे उपक्रम त्यांनी केले आहेत.

सायकल वाटप प्रसंगी राष्ट्रवादीचे रजत कुकडे, रोहित शेंडे, आदित्य गेडाम, राहुल बघमारे, शंकर पुरमशेट्टीवार, सोहेल भसारकर, नयन लाकडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!