चिंधिचक बसस्थानाकावर अपघातात एक ठार; गतिरोधकाची मागणी;
तळोधी :- प्रतिनिधी
नागभिड-तळोधी महामार्गावरील चिधिंचक बसस्थानकावर (ता.२७ ऑगस्ट) ला फार्चुन गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालक गंभिर जखमी झाला. अपघातानंतर उपचारासाठी ब्रम्हपुरी येथे दाखल केले असता दुचाकी चालक मेरेश्वर काशिनाथ सातपैसे (वय ५५ वर्ष) रा. चिंधिचक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार काल सायंकाळी चार वाजता चे दरम्यान फार्चुन वाहन क्रमांक एम.एच.३१-एफ बी-३३७७ ने जोरदार धडक दिल्याने दुचाकी वाहन क्रमांक एम.एच.३४-बी.टि-०५५४ ने प्रवास करणाऱ्या. मोरेश्वर सातपैसे यांचे दुचाकीला जोरदार धडक दिल्याने गंभिर जखमी झाले. लगेच उपचारासाठी ब्रम्हपुरी येथिल खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
*गतिरोधकाची मागणी* - चिंधिचक बसस्थानाकावर या परिसरातील किटाळी बोरमाळ, मांगरुळ, खडकी हुमा, गोविंदपूर या गावातील प्रवासाची नेहमीच वर्दळ असते. चिधिंमाल येथिल शालेय विद्यार्थ्यांना याच रस्त्याने ये-जा करावी लागतो. एका शालेय विद्यार्थ्यांचा यापूर्वी मृत्यू झाला होता. अनेकदा अपघातांत येथे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे येथे त्वरीत गतिरोधक बसविण्याची यावे अशी मागणी सरपंच हरि वरठे, उपसरपंच प्रदिप समर्थ, भाजपा तालुका महामंत्री जगदिश सडमाके, सुधिर जीवतोडे, यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!