ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल मौदा येथे सायबर सुरक्षेची जनजागृती
उप संपादक
विलास मोहिनकर
चंद्रपूर : - क्विक हिल फाऊंडेशन सोबत, सुरु झालेल्या 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' या अंतर्गत मौदा येथील ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल मौदा येथील विद्यार्थ्यांना जे.एम.पटेल कॉलेज, भंडारा च्या संगणक शाश्त्र विभागाचे तनुश्री कुंभारे व ईशा तिबुडे या विद्यार्थ्यीनीं नी सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन करत सायबर सुरक्षेची गरज अधोरेखित केली. मोबाईलचा वापर करत असतांना इंटरनेट व सायबर सुरक्षित व सतर्क राहणे गरजेचे असते हे देखिल त्यांनी उदहारणासह पठवून दिले. सायबर वॉरिअर तनुश्री कुंभारे व ईशा तिबुडे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत इत्यंभूत माहिती देऊन स्वतःला व स्वतःच्या परिवाराला कसे सुरक्षित राहावे या बाबत अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले.
ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुल मौदा विद्यार्थ्यांना क्विक हिल फाऊंडेशन तर्फे उत्कृष्ठ व्यासपीठ मिळाले असल्याचे मुख्याध्यापक प्रा.अमोल धनजोडे सर यांनी सांगितले व यासाठी फाऊंडेशनच्या अनुपमा काटकर व अजय शिर्के यांचे त्यांनी आभार मानले. कार्यकमाचे आयोजन सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केली होती. सायबर वॉरियर तनुश्री कुंभारे व ईशा तिबुडे यांनी विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्टपणे यावेळी मार्गदर्शन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!