ईलेक्ट्रीकल ऍल्यूमिनियम तारेच्या चोरीतील आरोपीस अटक
भिसी पोलीस स्टेशन ची कारवाई
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक. २७/०८/२०२५ रोजी फिर्यादी नामे नितेश कोंडूजी गव्हारे, सुपरवायझर समिक्षा अँन्ड डिम्पल ईलेक्ट्रीकल कंपणी चामोर्शी, जि. गडाचिरोली यांनी पोलीस स्टेशन भिसी येथे तक्रार दिली की, जांभुळघाट ते खापरी येथे जाणाऱ्या १७ पोलवरील विजेची ऍल्युमिनियम तार कि. १,००,०००/- रु. काही दिवसापूर्वी अज्ञात चोराने चोरुन नेली अशा फिर्यादी यांचे फिर्याद वरुन पो.स्टे. भिसी, जि. चंद्रपुर येथे अपराध क्र. ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.सदरची चोरी गंभीर स्वरूपाची असल्याने वरीष्टांचे आदेशाने भिसी पोलीसांना तात्काळ तपास पथक तयार करुन गुन्हयाचा छडा लावण्याबाबत चे आदेश प्राप्त झाल्याने भिसी पोलीसांनी तपास पथक तयार करुन ' आरोपी व मद्देमालाचा शोध घेत असता, वरील गुन्हयाचे अनुशंगाने मुखबिरद्वारे माहीती मिळाली कि, जांभळघाट येथील (१) आनंद गुलाब नेवारे, वय-२१ वर्ष, (२) मंगेश निलकंट बारेकर, वय-२४ वर्ष, दोन्ही रा. जांभुळघाट यांनी काही दिवसापुरवी जांभुळघाट परीसरातील ईलेक्ट्रीक सप्लायची ऍल्युामिनियमची तार चोरी केली आहे. अशा विश्वसनिय माहीतीवरुन पोलीस स्टेशन भिसी येथील तपास पथकाने वरील दोन्ही आरोपीना ताब्यात घेऊन सखोल चौकशी कैली असता, वरील गुन्हा केल्याचे कबुली दिली तसेच चोरी करण्याकरीता आम्हाला क्रिष्णा रमेश मिटपल्लीवार, वय-२३ वर्ष, रा. जांभुळघाट याने मदत केली तसेच सदर चोरीचा माल जांभुळघाट येथील (१) रोशन अन्नाजी हजारे, वय-२२ वर्ष, व कुणाल गणेश हजारे, वय-१९ वर्ष, यांना विक्री केली. यावरुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी चोरीची तार विकत घेतल्याची कबुली दिली. व सदरची तार आम्ही सागर अन्नाजी हजारे, वय-२६ वर्ष, व विजय नंदकिशोर भेंडवाल, वय-२१ वर्ष, दोन्ही रा. जांभुळघाट यांचे मदतीने आरोपी कुणाल हजारे याचे ईन्ट्रा कंपणीची चारचाको गाडी क्र. एमएच ३४ बिजी ९४९७ यातुन घेऊन जाऊन जांभुळघाट ते खापरी रोडच्या बाजुला असलेल्या जंगली झाडी झुडपात लपवुन ठेवली. सदरचा लपवुन टेवलेला मृदेमाल ईलेक्ट्रीक सप्लायची ऍल्यूमिनियमची तार किंमत. १.०००००/- रु ईन्ट्रा कंपणीची चारचाकी गाडी क्र. एमएच ३४ बिजी ९४९७ कि. "५,०००००/- रु. असा एकुण ६,०००००/-"रु. चा मुदेमाल आरोपीकडुन जप्त करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले.सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक चंद्रपुर सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर ईश्वर कातकडे सा. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुर दिनकर टोसरे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी टाणेदार, पोलीस स्टेशन भिसी., सपोनि मंगेश भोंगाडे, पोउपनि रविंद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोहवा अजय बगडे, पोअं सतिश झिलपे, पोअं श्रीकांत वाढई, पोअं रेखलाल पटले, पोअं वैभव गोहणे, यांनी हि कामगिरी पार पाडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!