चिमूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा 'सलाईन'वर - प्रहार सेवक विनोद उमरे यांचा आरोप

चिमूर तालुक्यातील आरोग्य केंद्रात मनुष्यबळ कमी असल्याने रुग्णाची होत आहे गैरसोय

उप संपादक
विलास मोहिनकर

चंद्रपूर : - चिमूर तालुक्यात प्राथमिक  आरोग्य केंद्र ७ आहे तर काही उपकेंद्र आहे.आरोग्य केंद्रात मनुष्यबळ कमी असल्याने रुग्णाची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस काळ पडल्याने साथीचे आजार सुरु आहे.चिमूर तालुक्यातील आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढू लागले आहे.पण वाढत्या रुग्णाची आरोग्य केंद्रात मनुष्यबळ कमी असल्याने गैरसोय होताना दिसून येत आहे.त्यामुळे चिमूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचा आरोप प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केला आहे.आरोग्य सेवा सुरळीत राहून रुग्णांना आरोग्याविषयी अडचणी निर्माण होणार नाहीत म्हणून शासन आरोग्य यंत्रणेवर लाखो रुपये खर्च करत आहे.परंतु ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचावी व गरिबांना आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाव्यात, या उदात्त हेतूने शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राचीव उपकेंद्राची निर्मिती केलेली आहे. तरीही चिमूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळ कमी असल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.गौर सोय होताना पण दिसू  लागले आहे.म्हणूनच चिमूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचा आरोप प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!