गणपती विसर्जन करतांना इसम बुडाला - पोलीस व बचाव पथकाकडून शोधकार्य सुरु
सावली - सावली तालुक्यातील चांदली बुज. येथे गणपती विसर्जन दरम्यान बंडू हा इसम नदीत बुडाला. सकाळपासून चंद्रपूर येथील बचाव पथक व सावली पोलिसांकडून शोध सुरु असून वृत्त लिहीपर्यंत इसमाचा मृतदेह सापडला नाही.
चांदली बुज. येथे सकाळी आठ वाजताच्या सुमारास गावातील घरगुती गणपती विसर्जन करण्यास नदीवर गेले. गणपतीचे विसर्जन करतांना बंडू मंदावार वय ६० या व्यक्तीचा नदीच्या प्रवाहात तोल गेला. सोबत्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह भरपूर असल्याने इसम वाहून गेला. सावली पोलीस व चंद्रपूर येथील बचाव पथकाकडून शोध सुरु असून वृत्त लिहीपर्यंत शोध लागलेला नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!