मी दारुडा....! अशी ओळख करून देत दारुमुक्तीचा संकल्प चांदली बुज. येथे नवराष्ट्र समूहाचा वर्धापन दिन साजरा
सावली - दारूच्या व्यसनाने स्वतःची, कुटुंबाची होत असलेली हानी लक्षात घेता अल्कोहोलिक ॲनॉनिमस या व्यसनमुक्ती समुहासोबत जुळले. त्याचा इतका प्रभाव पडला की स्वतः दारू सोडली व आपली ओळख करून देतांना आपल्या नावासमोर मी दारुडा अशी ओळख करून देत दारुमुळे काय हानी झाली व त्यातून कसा सावरलो याची माहिती कार्यक्रमात जाहीररित्या अनुभव कथन करत व्यसनमुक्तीचा संकल्प करीत होते. अशा प्रकारचा आगळा वेगळा व्यसनमुक्ती कार्यक्रम नवराष्ट्र समूह चांदली बुज. यांच्या वर्धापन दिनानिमित्त पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते चंदू पाटील मारकवार होते.
अलकोहोलिक्स अनॉनिमस ही स्वतः मद्यापासून दूर राहात इतरांना मद्यासक्तीतुन बाहेर पडण्यास इच्छा असेल तर स्वानुभवातून मदत करण्याच्या हेतूला वाहून घेतलेली मद्यासक्त लोकांची आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणारी फेलोशिप आहे. अलकोहोलिक्स अनॉनिमस अव्यावसायिक, कोणत्याही धर्म व पंथ वा राजकीय पक्ष यांच्याशी न जोडलेली फेलोशिप आहे. या माध्यमातून दारू या व्यसनापासून दूर राहून इतर व्यसनींना व्यसनमुक्त करण्यासाठी समूहात जोडले जातात. दारू पिणे हा आजार असून या आजारातून मुक्त करून व्यसनमुक्त समाज घडविण्याचा प्रयत्न केल्या जातो. या आजारातून शेकडो मद्यपी बरे झाल्याचे दिसत असून या समूहात सामील होऊन कुटुंबात, समाजात सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमात माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, पोलीस पाटील चिंतामण बालमवार, जिल्हा परिषद मुख्याध्यापिका येडनुतलवार यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला व्यसनमुक्त होणारे कार्यकर्ते आपल्या कुटुंबासह उपस्थित होते तर कार्यक्रमात अनेक नवीन लोकांनी व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे संचालन किशोर डब्लू. यांनी तर आभार प्रदर्शन प्रविण एम. यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!