शालेय जिल्हा कॅरम स्पर्धेत नेहरू विद्यालय शेगाव(बुज) चे घवघवीत यश

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - चंद्रपूर येथे दिनांक 28 व 29 आँगष्ट ला संपन्न झालेल्या शालेय जिल्हा कॅरम स्पर्धेत तालुक्यातील नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शेगाव (बुज) येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत चांगली छाप पाडली आहे.
यामध्ये एकूण सहा खेळाडूंनी विजेतेपद व उल्लेखनीय कामगिरी करत गडचिरोली येथे होणाऱ्या विभागीय कॅरम स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. U-19 मुली गटात लक्ष्मी कोटकर हिने दमदार खेळ सादर करत प्रथम क्रमांक पटकावला तर चैतन्या गिरडे हिने तृतीय क्रमांक मिळवत आपली चमक दाखवली u-19 मुले गटात प्रेम सोनूने याने चिकाटीच्या बळावर तृतीय क्रमांक मिळवला.
u-17 मुले गटात अनुराग मेश्राम याने संघर्षमय लढतीत द्वितीय क्रमांक मिळवत पुढील फेरीत मजल मारली. तर u-17 मुली गटात युग निखारे व नाविन्या पाटील यांनी प्रभावी खेळ करत विभागीय स्पर्धेसाठी थेट निवड मिळवली.
खेळाडूंच्या या यशामुळे नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शेगाव (बुज) येथे आनंदाचे वातावरण आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, व्यवस्थापन मंडळ तसेच पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले असुन या सहा खेळाडूंनी मिळवलेले यश हे सततच्या मेहनतीचे व मार्गदर्शक  नरेन्द्र गुरुदास कन्नाके यांच्या खेळाडूंना दिलेल्या योग्य मार्गदर्शनाचे फलित असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.चंद्रपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नेहरू विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सातत्याने केलेली प्रगती ही लक्षणीय आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमधून स्वतःची गुणवत्ता सिध्द करून जिल्हा व विभागीय पातळीवर स्थान पटकावणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
खेळाडूंना विभागीय कॅरम स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना विद्यालयाचे प्राचार्य बालाजी ढाकूणकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जिद्द, मेहनत, मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश शक्य झाले असून भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरही विद्यार्थी चमकतील, अशी अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!