जनावरांना क्रूर वागणूक व अवैध वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई: एकुण 23,80,000/- रु. चा मुद्देमाल जप्त
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - जवाहरनगर पोलिसांनी दिनांक.30 ऑगस्ट 2025 रोजी, पहाटे 4:00 वाजता मौजा कोंढी गावाजवळ आरोपी नामे (1) आसिक मनहरण जोशी वय 24 वर्ष रा.भिलाई ता.धमदा जि.दुर्ग, रा. छतीसगढ व 2) मालक रोशनलाल रामस्वरुप डहेरिया यय 33 वर्ष रा. पथारा, ता.धमदा, जि. दुर्ग रा. छत्तीसगढ त्यांचे ताब्यातील तपकिरी रंगाचे आयसर कंपनीचे वाहन क्र. CG 07 CX 3833 कि, 20.00,000 /- रु चे वाहनाचे डाल्यात काळे, पांढरे च लालसर रंगाचे एकूण 38 गोवंश जातीचे जनावरे किं, 3.80,000 /- रु. चे जनावरे हे त्यांना वाहतूक करणे करिता प्रत्येकी जनावरांस 2×2 मिटर जागा असणे बंधनकारक असतांना सुध्दा त्यांनी आपले वाहनाचे डाल्यात पूरेशी जागा उपलब्ध नसंताना जनावरे निर्दयतेने दाटीवाटीने कोंबुन कत्तलीसाठी, अपुऱ्या जागेत जनावरांना त्रास होईल अशा स्थितीत, तहानेने व्याकुळ झालेले, अन्न पाणी, निवा-याची सोय न करता क्रूरतेची वागणूक देवून अवैधरित्या वाहतुक करतांना मिळून आले असून त्यातील 4 जनावरे हे मृत पावले आहेत. असे फिर्यादीचे लेखी तक्रारी वरुन आरोपीतां विरुध्द 314 / 2025 अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5. 5 (अ). 5 (ब), 9 आणि प्राणी क्रूरतेने वागविण्यापासपून प्रतिबंधक अधिनियम, कलम 11(1) (घ). (च). (ड). (ज). (झ) तसेच भारतीय दंड संहिता, कलम 325 अन्यये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला हि कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पो.नि पाटील यांच्या मार्गदर्शनात पो.उप.नि चुटे, स.फौ गोंडाने पोहवा सपाटे, पोशि, नारनवरे पो.स्टे. जवाहरनगर यांनी केली असुन पुढील तपास पो.उपनि. दुधकावरा पोलीस स्टेशन जवाहरनगर करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!