सरपंचच ठोकणार ग्राम पंचायत कार्यालयाला ताला
स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचा गंभीर इशारा
ग्राम पंचायत च्या विविध योजनांचा विकास निधी अडवून का ठेवला? शासनास विचार करण्याची बाब
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - गावाचा विकास व शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्याचा मुख्य दुवा ग्राम पंचायत चा सरपंचच असतो.मात्र चिमूर तालुक्यासह पूर्ण जिल्ह्यात सरपंच,उपसरपंच यांच्या अनेक समस्या आजही आवासून उभ्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी सरपंच स्वराज्य सेवा संघटनेचे सरपंच दिनांक. १ सप्टेंबर ला ग्राम पंचायत कार्यालयाला ताला ठोकणार असल्याचा गंभीर ईशारा जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे,त्यामुळे प्रशासनात आता मोठी खळबळ उडाली आहे.
गावातील नागरिकांना नाली,रस्ते,विद्युत,पाणी या प्राथमिक सुविधा पूरवण्याचे काम ग्राम पंचायत स्तरावरून केले जाते. मात्र या प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठीही राजकीय हस्तक्षेप होत आहे.
विविध ग्राम पंचायत चे सरपंच हे फक्त नाममात्र राहिले आहेत. त्यामुळे सरपंच यांच्या अधिकारात हस्तक्षेप टाळावा व गावाचं विकास व्हाव या करिता स्वराज्य सरपंच संघटना आक्रमक झाली असून गावाच्या विकासासाठी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयाला एक सप्टेंबरला पूर्णतः ताला ठोको आंदोलन तालुक्यात करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी शुक्रवारी संवर्ग विकास अधिकारी यांचे मार्फत दिले आहे.
यावेळी सावरी येथील सरपंच लोकनाथ रामटेके,सरपंच रामदास चौधरी, उपसरपंच अशोक चौधरी, उपसरपंच प्रिती दिडमुठे,उपसरपंच वैभव ठाकरे आदी सरपंच यावेळी उपस्थित होते.
या आहेत सरपंच,उपसरपंच यांच्या मागण्या!
१) म.ग्रा.रो.ह.योजना प्रभावीपणे राबवून कामाची देयके निर्धारित वेळेत देण्यात यावे.
२) निधी अभावी जल जीवन मिशनची थकित असलेली कामे त्वरित सुरू करण्यात यावे.
३) ग्राम पंचायत ला प्राप्त होणाऱ्या ग्रामनिधीत राजकीय व लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप टाळून निधी देण्यात यावा.
४) सरपंच उपसरपंच यांचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे .
५) ग्राम पंचायत क्षेत्रातील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे काढताना पोलीस बंदोबस्ता करिता करावयाच्या कार्यवाही बाबत स्पस्ट सूचना देण्यात याव्या.
६) कोरोना काळात केलेल्या कामगिरीबाबत सरपंचांना विशेष मानधन देण्यात यावे.
सरपंच यांची बैठक लावण्याचे आश्वासन फोल?
स्वराज्य सरपंच सेवा संघटनेद्वारे ४ऑगस्ट ला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सरपंच यांच्या विविध समस्याचे निवेदन देण्यात आले होते.
त्याअनुषंगाने चिमूर येथे स्वराज्य सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्या सोबत ३० ऑगस्टला बैठक लावण्याचे आश्वासन मुख्य कर्यपालन अधिकारी यांनी दिले होते.
मात्र कुठलीही बैठक न लावल्याने सरपंच यांना दिलेले आश्वासन फोल ठरले आहे.त्यामुळे सरपंच यांच्यात प्रशासना विषयी नाराजी पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!