गौरीचे आगमन, घराघरात सजावट.. प्रथा, परंपरेनुसार ज्येष्ठागौरीची पूजन...
गौरीचे आगमन, घराघरात सजावट..
प्रथा, परंपरेनुसार ज्येष्ठागौरीची पूजन...
वरोरा..... जगदीश पेंदाम
गौरी पूजन व महालक्ष्मी पूजन हे हिंदू महिलांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे महाराष्ट्रातल्या सणापैकी गौरी पूजन हा एक महत्त्वाचा सण आहे, तसेच त्याला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असे म्हणतात..
तेज,समृद्धी, मांगल्याचे प्रतीक असणारा या गौरीचे आगमन आज 31 ऑगस्ट ला रविवारी झाले असून त्यांच्या स्वागताकरिता महिलांनी सुंदर सजावट सुरू केली आहे. काही ठिकाणी वर्षाउभ्याचा असलेल्या महालक्ष्मी तर कुणाकडे खरड्याच्या महालक्ष्मी बसतात, अनेक ठिकाणी पारंपारिक पद्धतीने तसेच परंपरेनुसार गौरीची सजावट केली जाते, तिच्या अंगावर दागदागिने पूर्ण सजावट करून गौरीला बसवत असतात दरवर्षी ठिकठिकाणी महालक्ष्मीचा देखावा मनमोहक पहायला मिळत असते..
गणपतीच्या पाठोपाठ महालक्ष्मी गौरीचे आगमन होत असुन ज्येष्ठा, कनिष्ठा, महालक्ष्मीला लागणाऱ्या प्रसादासाठी, भाजीपालापासून तर दागदागिने यांच्या खरेदीसाठी सुहासिनी महिलांनी बाजारपेठेकडे धाव घेतली आहे, उभ्याच्या महालक्ष्मी सजवण्यासाठी नवीन काठापदराची पैठण,दागदागिने, शाल,शृंगार खरेदी करणे तसेच खरड्याच्या पासून तयार करणाऱ्या महालक्ष्मी करिता मुखवटे रंगवणे हात,पाय, स्टॅन्ड सजावट, अलंकार सजावट पूजेचे सामान खरेदी करताना दिसतात.
गौरी तसेच गणपतीची नाते हे काही ठिकाणी गौरी म्हणजे गणपतीची आई( देवीपार्वती) असे मानले जाते, तर बऱ्याच ठिकाणी गौरी म्हणजे गणपतीची बहीण असे सुद्धा मानले जाते त्या साठीच ती बहीण म्हणून भावाकडे पाहुणचारासाठी येत असेल असेही म्हटले जाते. महालक्ष्मी हा सण पारंपरिक पद्धतीने घराघरात पाडल्या जात असून याकरीता महाप्रसाद, दर्शनासाठी नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शेजारी ,गावातील नागरिक यांची गर्दी होत असते गणपतीचे आगमन झाल्यानंतर महालक्ष्मी गौरीचे सुद्धा आगमन होत असते भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्र्यावर महालक्ष्मी गौरीची आगमन होत असून गौरीला माहेरवाशीन सुद्धा समजले जाते गौरीच्या रूपात पार्वतीचे आगमन होते व आपल्या मुलाला गणपतीला घेऊन जाण्यासाठी येते असे आजही ज्येष्ठ नागरिकाकडून सांगण्यात येते, गौरी आल्यानंतर दोन दिवसाची घरी पाहूनी म्हणून ती येत असते अनुराधा नक्षत्रावर ती येते दुसऱ्या दिवशी जेष्ठ नक्षत्रावर पूजन करण्यात येत असून त्याला ज्येष्ठा गौरी पूजन असे म्हणतात, वेगवेगळ्या ठिकाणी ज्येष्ठागौरीची पूजन हे वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येत असते..
शेगाव येथील पोलीस स्टेशनच्या बाजूला तीन पिढ्यापासून गौरी महालक्ष्मी पुजन मांडण्याची प्रथा सिद्धमशेट्टीवार यांच्या घरी आहे मोठ्या प्रमाणात शेगाव परिसरातील नागरिक महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात तसेच मी 71 वर्षाच्या असून 55 वर्षापासून गौरी महालक्ष्मी पूजन करत आहे...
बबन पांडुरंगजी सिद्धमशेट्टीवार शेगाव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!