ट्रॅक्टर च्या कॅचबील ने भारतीय सेनेतील जवानाचा मृत्यू
घटनास्थळावरून ट्रॅक्टर चालक फरार
नेरी - प्रतिनिधी ( शुभम बारसागडे )
नेरी : - नेरी जांभूळघाट मार्गावरील रामपूर गावाजवळ आज दि.०९ ऑगस्ट ला सायंकाळी ०६:०० वाजताच्या दरम्यान एक भीषण अपघात घडला असून, या अपघातात भारतीय सेनेतील जवान अविनाश शामराव खेडेकर वय ३५ वर्षे रा. मोहाडी तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर यांचा जागीच मृत्यू झाला.आज रक्षाबंधन असल्याने मृतक अविनाश व त्यांची पत्नी आणि लहान भावाची पत्नी या दोघी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी सकाळी बस ने नेरी जवळ लागूनच असलेल्या कळमगाव येथे आलेल्या होत्या त्यांना घेण्यासाठी अविनाश मोहाडी वरून कळमगाव ला येत असताना रामपूर रोडवर समोरून धान पिकांची चिखलटी आटपून ट्रॅक्टर घेऊन येत असताना ट्रॅक्टरच्या कॅचबिल ची धडक बसून भीषण अपघात झाला. हा अपघात ईतका भीषण होता की, ट्रॅक्टर चे कॅचबिल बाहेर निघून रस्त्याच्या कडेला पडले होते. या अपघातात मोहाडी येथील युवक आणि भारतीय सेनेतील जवान, अविनाश शामराव खेडेकर या ३५ वर्षीय युवकांचा जागीच मृत्यू झाला. मात्र अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. ट्रॅक्टर कुणाचे आहे आणि कोणत्या दिशेला गेला याची माहिती अजूनही मिळाली नाही.सदर मोटरसायकल रॉयल इंनफिल्ड कंपनीची असून, (MH34 - BW-100 ) नंबर आहे. या भीषण अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती पिंटू खाटीक सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलिसांना तात्काळ दिली असता पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. तसेच घटनास्थळावरील लोकांनी सांगितले की मोटरसायकलस्वार रस्त्यावर बराच अंतरावर फेकला गेला आणि ट्रॅक्टरचे कॅचबिल सुद्धा रस्त्याच्या बाजूला खाली पडले होते.चिमूर पोलिस तातडीने पोहोचले, मृतदेह ताब्यात घेऊन, पोस्टमार्टेम करिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले आहे. पुढील तपास चिमूर करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!