९ ऑगस्ट क्रांती दिनी चिमूर आगारात बस विना प्रवास्यांचे बेहाल

शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )

चिमूर : - दिनांक.९ ऑगस्ट हा क्रांती दिन तसेच रक्षाबंधनाचा दिवस असतांना अनेक महिला आपल्या भावाला राखी बांधायला भावाच्या गावी जायसाठी एस.टी.बस पकडायला गेल्या होत्या तर काहीजण बहिणीच्या गावाला जाण्यासाठी पुरुषांना सुद्धा चिमूर आगारात बसची वाट बघावी लागली परंतु तासन - तास बस उपलब्ध करून न दिल्याने बस विना प्रवास्यांचे बेहाल झालेल्याचे चित्र बघावयास मिळाले.कधी चिमूर आगारात प्रवास्यांना पिण्याचे पाणी नाही तर विदयार्थ्यांना शालेय शिक्षण घेण्यासाठी वेळेवर बस उपलब्ध होत नाही. अशाप्रकारे अनेक समस्यांनी नावलौकिक केले आहे. म्हणूनच चिमूर आगारात प्रवासी व विद्यार्थी यांना वेळेवर बस उपलब्ध करून देण्यात यावी अशी प्रवास्यांकडून मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!