वरोरा - चिमूर राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यात प्रशासनाला आले यश
राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वाहतूक करिता मोकळा
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - विविध समस्यांनी ग्रासलेले वरोरा शहर संपूर्णतः अतिक्रमणाने वेढलेले असुन अनेक वर्षापासून जनतेला वरोरा ,चिमुर रस्त्यावर वाहतूक करीता अडचणी निर्माण होत असल्यामुळे जनतेला वाहतूक करताना त्रास सहन करावा लागत असायचा आजपर्यंत शासन प्रशासन अयशस्वी राहिले अखेर वरोरा, चिमूर ३५३ ई महामार्गावरील आनंदवन चौकातील अतिक्रमण हटविण्यात आले.आनंदवन चौकात जगन्नाथ महाराजांचे मठ असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे.तसेच याच परिसरात जगविख्यात समाजसेवक यांचे कर्मभूमी असलेले आनंदवन आहे या ठिकाणी नेहमी देशी विदेशी पर्यटक येत असतात याच वरोरा - चिमूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत महारोगी समिती आनंदवन द्वारा अंतर्गत नामांकित आनंद निकेतन महाविद्यालय,कृषी महाविद्यालय,आनंद माध्यमिक विद्यालय असून हजारो विद्यार्थी सदर संस्था मध्ये शिक्षण घेत आहे.परंतु याच मार्गाने ठिकठिकाणी मास विक्रीचे दुकाने थाटली गेली त्यामुळे महाविद्यालयात ,विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधी शी सामना करीत मुकाट्याने जावे लागत होते. अतिक्रमणधारकांनी मनाला वाटेल तसे अतिक्रमण करून आपले व्यवसाय थाटले . तसेच पूर्णतः आनंदवन चौक विद्रूप करून टाकला होता.राष्ट्रीय महामार्ग सहा. अभियंतानी सदर अतिक्रमण धारकांना नोटीस बजावून अतिक्रमण काढण्यासाठी त्यांना सात दिवसाची मुदत देण्यात आली होती असे कळते.परंतु अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण स्वतः हटविले नसल्याने,राष्ट्रीय महामार्गाचे सहा.अभियंता ,महसूल विभाग, पोलीस विभाग व.विद्युत महामंडळाचे अधिकारी यांच्या संयुक्त सहकार्याने ६ ऑगस्ट २०२५ ला सकाळचे सुमारास भूमिअभिलेख नकाशांनुसार तीस मीटर हद्दीतील सर्व व्यावसायिकांची केलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. आनंदवन चौक ते आनंद निकेतन महाविद्यालय पर्यंत दोन्ही बाजूंचे वाढलेले अतिक्रमण काढण्यात आले.त्यामुळे मार्ग पूर्णतः मोकळा झाला.पहिले अतिक्रमण हे वाहतुकीला अडसर होते परंतु.आता वाहतुकीसाठी असलेला अडसर दूर झाला.अतिक्रमण हटाव मोहिम सुरू असताना चिमूर राष्ट्रीय महामार्गाचे सहा.अभियंता डी ए.ताजने,सहा.अभियंता एस.पी.गोगटे,आपल्या टीम सह उपस्थित होते.तसेच पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, ए पी आय भस्मे, पी एस आय पवार, सामलवार,खुपिया विभागाचे वराटकर,ट्रॅफिक चे चिकणकर सह आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.यासह नायब तहसीलदार बोरडे , आर आय गेडाम, साजा तलाठी. करमनकर,विद्युत महावितरण अभियंता प्रफुल लालसरे,यांनी आपल्या टीम सह उपस्थित राहून सर्व अतिक्रमण धारकांचे मीटर काढण्यात आले.महामार्गाचे अभियंता ताजने यांनी लालसरे यांना सांगितले की यापुढे अतिक्रमण धारकांना विद्युत कनेक्शन देऊ नये असे सांगण्यात आले.अतिक्रमण मधून सुटलेलेन चौकातील ४ ते ५ दुकाने भूमिअभिलेख कडून मोजणी करून नंतर कारवाई करण्यात येणार आहे.अतिक्रमण हटविण्याने दिव्यांगाना दिलासा आनंदवन येथे दिव्यांग विद्यार्थी व पुरुष ,स्त्री हे काही कामानिमित्त आनंदवन चौकात येताना त्यांना अतिक्रमणामुळे खोळंबलेल्या वाहतूक व्यवस्थेशी व रस्त्यावर विक्री होत असलेल्या मास मटण चे दुर्गांधेशी त्यांना सामना करावा लागत होता.परंतु अतिक्रमण हटविल्याने दिव्यांगना दिलासा मिळाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!