वृक्षारोपण करून उप कार्यकारी अभियंता यांनी केला वाढदिवस साजरा

वृक्षारोपण काळाची गरज का? केले स्पस्ट

शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )

चिमूर : - दिनांक. ०६/०८/२०२५ ला चिमूर तालुक्याचे उप कार्यकारी अभियंता संजय जळगावकर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपविभाग चिमूर येथील प्रांगणात वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.व वृक्षारोपणाचे महत्व काय ते पटवून देत का गरज आहे ते स्पस्ट करीत झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात. ज्यामुळे हवा शुद्ध होते, झाडांच्या मुळ्या मातीला धरून ठेवतात. ज्यामुळे मातीची धूप थांबते,झाडे पावसाचे पाणी धरून ठेवतात आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवतात.तर झाडे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्ष्यांसाठी निवासस्थान आणि अन्न पुरवतात, ज्यामुळे जैवविविधता सुद्धा वाढते. झाडे वादळे, पूर आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करतात.झाडे आपल्याला फळे, फुले, लाकूड आणि इतर उपयोगी वस्तू देतात, ज्यामुळे मानवी जीवनास आर्थिक लाभ मिळतो. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, कारण ते पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींसाठी हे करणे अत्यावश्यक आहे.अशाप्रकारे मनोगत व्यक्त केले.यावेळी कार्यालयीन कर्मचारी तसेच इतर नागरिक सुद्धा उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!