मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांची निमढेला गावाला भेट

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा,चिमूर तालुक्याच्या क्षेत्राच्या विकासाच्या भौऱ्यात सापडलेल्या निमढेला गावाला दौऱ्यावर असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकितसिंग चंद्रपूर यांनी भेट देऊन जलजीवन मिशन अंतर्गत कामाची पहाणी केली.चिमुर तालुक्यातील मागील ४० वर्षापासून निमढेला हे गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असून अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात निमढेला गावचा विकास झालेला नाही. वारंवार गावातील नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा या गावाचे प्रश्न मार्गी लागले नसल्यामुळे तसेच सरकारच्या ऑनलाईन प्रणाली मध्ये मागील १० वर्षा पासून वरोरा तालुका तसेच चिमूर तालुक्यात कुठेही नाव नसल्याकारणाने मागील कित्येक वर्षापासून या गावातील घरकुल चे काम रखडलेले आहे व अशाच काही समस्या मुळे मागील लोकसभा निवडणुकीच्या काळात याच गावांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता. काल चिमूर तालुक्याच्या दौऱ्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकितसिंग चंद्रपूर हे जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी या गावात आले होते, खानगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावाला 72 नळे देण्यात आली आहे.गावात सोलर पॅनलवर जलजीवचे नळ सुरू असुन गावातील नागरिकांनी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी केलेली आहे. तसेच गावातील नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर गावातील समस्यांचा पाढा वाचला असता गावकऱ्यांच्या समस्या मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग  यांनी जाणून घेतल्या असून यावेळी उपस्थित विस्तार अधिकारी चिमूर शामकुळे, खामगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक कवाडे ,किशोर हनवते ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!