"महिलांच्या सुरक्षेपेक्षा अवैद्य वाहतूक महत्त्वाची? मूल बसस्थानकातील पोलीस शेड हटविल्याने संतापाचा भडका!"

 "महिलांच्या सुरक्षेपेक्षा अवैद्य वाहतूक महत्त्वाची? मूल बसस्थानकातील पोलीस शेड हटविल्याने संतापाचा भडका!"

मूल (प्रतिनिधी):

शहराच्या हृदयस्थानी असलेल्या मूल बस स्थानक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून महिला व विद्यार्थिनींवरील छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, लहानशा चोऱ्या, दादागिरी आणि गुंडगिरीने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नागरिक व विशेषतः महिलांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या.

यामुळे मूल पोलीस स्टेशनने बस स्थानक परिसरात पोलिस मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि तत्पूर्वी एक शेड उभारून सुरक्षेचा बंदोबस्त सुरू केला. हा निर्णय महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वागतार्ह ठरत असतानाच, ट्रॅव्हल्स आणि काळी-पिवळी वाहन चालकांनी याला विरोध केला, कारण त्यांच्या अवैध प्रवासी वाहतुकीवर यामुळे मर्यादा येणार होत्या.

या प्रवासी वाहनधारकांनी एका राजकीय नेत्याच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव टाकला आणि अखेरीस पोलीस शेड हटवण्यात आले. यामुळे महिला व विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांत प्रचंड संताप पसरला आहे.

महिलांची सुरक्षा आणि सार्वजनिक शांतता धोक्यात आली असताना, पोलीस आणि प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडून हा शेड हटवला, ही बाब अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे. नागरिकांचा सवाल आहे की – महिलांची सुरक्षा महत्त्वाची की अवैध प्रवासी वाहतूकदारांचे हित?

स्थानिक महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या लाचारीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत हा शेड पुन्हा तात्काळ बसवण्याची मागणी केली आहे.  

📣 महत्वाचे मुद्दे  

मूल बस स्थानक परिसरात महिलांची छेडछाड, चोऱ्यांची वाढ

पोलीसांनी उभारलेला मदत शेड वाहतूकदारांच्या दबावामुळे हटवला 

राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांचे पायबंद 

महिला, मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह 

नागरिकांत संताप, आंदोलनाची शक्यता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!