बँकेने शेकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसुली करू नका..
बँकेने शेकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसुली करू नका..
सक्तीने कर्जवसुली केल्यास प्रहार च्या पद्धतीने उत्तर देऊ
प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा..
वरोरा... जगदीश पेंदाम
निवडणुकीच्या काळात आगामी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा अशी घोषणा दिल्या होत्या. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा झालेला नाही. त्यांचेवर असलेले बँकेचे पिक कर्ज माफ झालेले नाही व त्याबद्दल कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही, त्यामुळे कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांचे कर्ज सक्तीने वसुली करू नये असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते यांनी दिलेला आहे. जर एखाद्या बँकेकडून अशा प्रकारची सक्तीने कर्ज वसुली केल्यास त्याला प्रहारच्या पद्धतीने उत्तर देऊ असे ठणकावून प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख शेरखान पठाण यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव बुद्रुक या गावाजवळील एका ग्रामीण भागातील शेतकऱ्याला शेगाव येथील एका बँकेने कर्ज वसुली बाबत पत्रक पाठवल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष शेगाव यांची भेट घेतली त्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शेरखान पठाण विनोद उंमरे, अक्षय बोंदगुलवार, अमोल दातारकर, राकेश भुतकर अन्य कार्यकर्ते यांनी शेगाव येथील बँकेच्या शाखा व्यवस्थापक यास समजावणी देऊन सक्तीने कर्ज वसुली करू नये असे ठणकावून सांगितले. तसेच कोणत्याही बँकेने सक्तीने कर्ज वसुली करू नये असे केल्यास प्रहार कार्यकर्ते यांच्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा अशी त्यांनी आवाहन केले आहे....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!