कन्या विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
वरोरा.. जगदीश पेंदाम
स्थानिक लोकमान्य कन्या विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी थाटात साजरी करण्यात आली. या प्रसंगी 30 विद्यार्थिनींनी लोकमान्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग, प्रेरक विचार कथन केले. पोवाडा व गीतांच्या माध्यमातून टिळकांना अभिवादन करण्यात आले. प्रमुख वक्ता राघवेंद्र अडोणी यांनी लोकमान्यांच्या झुंजार जीवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने त्यांची संघर्ष गाथा विषद केली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष योगिता हक्के यांनी समयोचित मार्गदर्शन केले. नववीच्या विद्यार्थिनी तृप्ती बहिरे व नंदिनी खिरटकर यांनी संचालन आणि गायत्री भोंग हिने आभार प्रदर्शन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख स्मिता तागडे यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.या कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!