जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा - या मोहिमेत गडीसूर्लातील जवानाचा सहभाग



मुल - जम्मू काश्मीरमध्ये राबविलेल्या 'ऑपरेशन महादेव' या मोहिमेत पहलगाम हल्यातील दहशतवादी मारल्या गेले या मोहिमेत गडीसूर्ला येथील जवान अक्षय चिट्टावार याचा समावेश असल्याने त्याचे अभिनंदन होत आहे.

      पहलगाम हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार व त्याच्या दोन साथीदारांचा लष्कराच्या विशेष पॅरा कमांडोंनी सोमवारी एका चकमकीत खात्मा केला. या कारवाईला 'ऑपरेशन महादेव' असे नाव देण्यात आले होते. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरनजीकच्या असलेल्या हरवनच्या जंगल परिसरात ही घटना घडली. या मोहिमेत चंद्रपूर जिल्ह्यातील गडीसूर्ला ता. मुल येथील अक्षय चिट्टावार या जवानाचा समावेश होता. राष्ट्रीय पातळीवरील या मोहिमेत सहभागी असल्याने जिल्ह्यात त्याचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!