सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या प्रफुल तुम्मे वर गुन्हा दाखल करा - सावली तालुका काँग्रेसची मागणी
सावली - पाथरी येथील उपसरपंच व प्रहार तालुका अध्यक्ष प्रफुल तुम्मे व जिल्हाध्यक्ष शेरखान पठाण यांनी "आमची सावली" या व्हाट्सअप ग्रुपवर काँग्रेस कार्यकर्ते व आमदार - खासदार यांची बदनामी कारक मजकूर प्रसिद्ध करून काँग्रेस कार्यकर्ते तथा नेत्यांचा अपमान केला आहे. अशा व्यक्तव्यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते त्यामुळे प्रफुल तुम्मे याचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस स्टेशन सावली येथे करण्यात आली.
प्रफुल तुम्मे यांनी अनेकदा सोशल मीडियावर बदनामिकारक लिखाण केलेले आहे. क्षेत्राचे लोकप्रतिनिधी आमदार विजय वडेट्टीवार व गडचिरोली - चिमूर खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या बाबतही नेहमी बदनामिकारक लिखाण केले आहे अश्या बदनामिकारक लिखणामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची अवमानना होत आहे. अश्या प्रकारच्या आक्षेपार्ह लिखाणामुळे तालुक्यात वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रफुल तुम्मे यांच्यावर गुन्हा दाखल करून सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यात यावा ही मागणी तक्रारीतून सावली पोलीस स्टेशनला केली आहे.
सदर तक्रार सावली तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांनी केली असून सोबत महिला तालुका अध्यक्ष उषाताई भोयर, शहराध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार, युवा तालुका अध्यक्ष किशोर कारडे, सरपंच संगठना अध्यक्ष पुरषोत्तम चुदरी, नगराध्यक्ष साधनाताई वाढई, माजी उपसभापती राजू पा.भोयर, ग्राम काँग्रेस रुद्रापूर अध्यक्ष खुशाल राऊत, ग्राम काँग्रेस अध्यक्ष उसेगाव सुनील पाल, नगरसेवक प्रितम गेडाम, अंतबोध बोरकर, जेष्ठ पदाधिकारी अनिल गुरुनुले, किशोर घोटेकर, श्रीकांत बहिरवार, दिलिप ठाकूर, जगदीश वासेकर, शिलाताई गुरुनुले, जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!