बल्लारपूर: ट्यूशनला येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून अत्याचार – पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
बल्लारपूर: ट्यूशनला येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून अत्याचार – पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
बल्लारपूर प्रतिनिधी वसंत मुन
बल्लारपूर शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ट्यूशनसाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार समोर आली असून, पोलिसांनी या प्रकरणी राजेश दामोदर बटटे (व्यवसाय – शिक्षक) याच्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी राजेश बटटे यांच्या घरी ट्युशनसाठी येत होती. तिच्या अल्पवयीनतेचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप आहे.
या प्रकरणी अप. क्र. 556/2025 अंतर्गत भारतीय नवीन दंड संहिता (BNS) चे कलम 64(1), 64(2)(f), 65(2), 127(2), 351(2) तसेच पॉक्सो कायदा 2012 चे कलम 4 व 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक करिश्मा बी. मोरे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!