मूल तहसिल कार्यालयात 1 ते 7 ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन

 मूल तहसिल कार्यालयात 1 ते 7 ऑगस्टदरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन

मूल (प्रतिनिधी) — शासनाच्या आदेशानुसार, दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान मूल तहसिल कार्यालयात महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिक केंद्रस्थानी ठेवून महसूल प्रशासन अधिक पारदर्शक व उत्तरदायी करण्याचा उद्देश आहे.

1 ऑगस्ट – उद्घाटन आणि गौरव समारंभ

महसूल सप्ताहाचा शुभारंभ तहसिल कार्यालय, मूल येथील सभागृहात पार पडणार आहे. विभागांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहायक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल व वाहनचालक यांचा गौरव व सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सेवाविषयक प्रकरणे निकाली काढणे व त्यांच्या समस्या समजून घेऊन थेट संवाद साधण्यात येणार आहे.

2 ऑगस्ट – अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप

सन 2011 पूर्वी शासकीय जमिनीवर रहिवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करणाऱ्या पात्र धारकांना पट्टे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी तहसिलदार, मुख्याधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, भूमिअभिलेख विभाग यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे.

3 ऑगस्ट – वृक्षलागवड आणि पांदण रस्त्याची मोजणी

मातोश्री पांदण रस्ते, बळीराजा पांदण रस्ते तसेच शासकीय कार्यालय परिसरात एकूण १५०० झाडांची वृक्षलागवड करण्यात येणार आहे. पांदण रस्त्यांची मोजणी करून पर्यावरण संवर्धनास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

4 ऑगस्ट – ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व अभियान’ अंतर्गत शिबिरे

चिखली, राजगड, चिरोली, बंबाळ आणि मूल या मंडळांमध्ये ‘महाराज्यस्व अभियान’ अंतर्गत शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरात:

  • प्रलंबित फेरफार प्रकरणांची निकाली काढणी

  • विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप

  • शासनाच्या कल्याणकारी योजना व कायद्यांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.

5 ऑगस्ट – डीबीटी विशेष मोहिम

"विशेष सहाय्य योजना" अंतर्गत ज्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) झालेले नाही अशा लाभार्थ्यांना घरभेटी देण्यात येणार असून, त्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा केली जाणार आहे.

6 ऑगस्ट – अतिक्रमण हटवणे व शर्तभंग प्रकरणांचा निर्णय

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करणे, अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेणे – जसे की नियमबद्ध करणे किंवा शासकीय खात्यात जमा करणे, अशी कार्यवाही केली जाणार आहे.

7 ऑगस्ट – M-Sand धोरण व समारोप समारंभ

सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी M-Sand धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून नवीन मानक कार्यपद्धती (SOP) प्रमाणे धोरण पूर्णत्वास नेले जाणार आहे.
यानंतर महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ उत्साहात साजरा केला जाणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!