चिमूर चंद्रपूर बसचा भीषण अपघात
वाहक ठार तर प्रवासी गंभीर जखमी
खडसंगी - प्रतिनिधी ( सिराज शेख )
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर एस टी बस पलटी मारल्याने एकाचा मृत्यू तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक.०५/०८/२०२५ ला दुपारी २ वाजताच्या सुमारास चारगाव खुर्द याठिकाणी पुलाजवळ घडली. एकीकडे प्रवासी सुरक्षेच्या डिंगे हाकणारे प्रवासी सुरक्षेचे व्रत घेणारे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंडळ यांची या अपघाताने झोप उघळेल काय? याच बस चालकाच्या हाताने चिमूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या निवासस्थानासमोर एस टी बस पलटी मारली होती त्यामध्ये सुद्धा प्रवासी गंभीर जखमी झाले होते. व जनमानसात अशीही चर्चा आहे कि या चालकाला फिट
( मिरगी ) सुद्धा येत असते. चिमूर आगार यांचे २०२४ ते २०२५ दरम्यान हा अंदाजे चौथा अपघात आहे. अशा घटनेने प्रवशी सुरक्षित राहतील काय? चिमूर वरोरा मार्गावर दैनंदिन एसटी महामंडळ च्या २५ ते ३० फेऱ्या आहेत. तर खाजगी वाहतुकीच्या ५० ते ६० फेऱ्या आहेत मागील २ दिवसा अगोदर अवैध प्रवासी वाहतुकी विरुद्ध प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी विशेष मोहीम फक्त वरोरा चिमूर मार्गावर राबविण्यात आली त्या करणात्सव प्रवास्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होतांना दिसून येत आहे. कदाचित क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून वाहतूक करीत असल्यामुळे हा अपघात घडला असावा अशी चर्चा जनतेमध्ये सुरु आहे.तरी सुद्धा प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने या अपघाताची सखोल चौकशी करावी अशीही मागणी प्रवासी व नागरिक करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!