चंदई नहर फुटल्याने लाखो लिटर पाणी गेले वाया

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव पासून जवळ येत असलेल्या रामदेगी परिसरात निमढेला तलावाला लागून चंदई नहर काढण्यात आलेला आहे मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे अचानक रात्रीला नहर फुटल्याने हजारो लिटर शेतकऱ्यांचे पाणी हे बरबाद झालेले आहे.या निमढेला तलावाचे पाणी चंदई नहराद्वारे जवळपास 20 किलोमीटर जात असून 6000 हे च्या जवळपास आसपास शेती ओलीता खाली नेहमी करण्यात येते.या तलावाचे बांधकाम चाळीस वर्षांपूर्वी करण्यात आली असून शेतकऱ्यांनी वारंवार चंदई नहराचे अनेक दिवसापासून ठिकठिकाणी फुटलेले भगदाड, काटेरी झाडे,गवत, कचरा साप करून बुजण्याची मागणी शेतकऱ्यांनी दोन वर्षापासून केली असून सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळ रात्री अर्जुनी झरी जवळ वीस फूट लांब नहर फुटल्याने हजार लिटर पाणी शेतकऱ्याचे बरबाद झालेले आहे अगोदरच या परिसरात पाऊस कमी पडल्यामुळे धान लागवड पिकावर संकट ओढवलेले आहे त्यातच नहर फुटल्याने धान पिकांना पाणी मिळणे कठीण झाले असुन या नहरद्वारे अर्जुनी, तुकुम, कोकेवाडा, तुकुम, किनाळा, आष्टा , मानकर कोकेवाडा, वडाळा, विलोडा, काटवल भद्रावती तसेच वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीकांना पाण्याचा लाभ मिळत असतो धान पिकांसाठी पाणी सोडण्यात असुन ठिकठिकाणी पडलेले भगदाड, काटेरी झाडे वनस्पती यांची दुरुस्तीची काम करण्याची मागणी दोन वर्षे आधीच शेतकऱ्याकडून करण्यासाठी प्रशासनाला सांगितले परंतु प्रशासन याकडे वारंवार दुरुस्ती नं केल्यामुळे हजार लिटर पाणी धान हंगामाच शेतकऱ्यांना प्राप्त न होता बरबाद झालेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!