सामूहिक श्री हनुमान चालीसा पठन, रक्षाबंधन उत्सव तथा क्रांतिदिनी CISF जवान सत्कार - विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

संकट समयी रक्षण करणारा शक्तिशाली पाठ म्हणजे श्री हनुमान चालीसा - प्राचार्य सदाशिव मेश्राम

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - तालुक्यातील खडसंगी येथील श्री हनुमान मंदिर देवस्थान या ठिकाणी दर शनिवार ला सामूहिक श्री हनुमान चालीसा पठन होत असते.  दिनांक 09 ऑगस्ट 2025 ला "198 वा शनिवार" सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण व रक्षाबंधन उत्सव कार्यक्रम सकाळी 7.15 ते 8.30 या कालावधीत संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असणारे ग्रामदर्शन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यलायचे प्राचार्य सदाशिव मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला. प्राचार्य मेश्राम  यांचा स्वागत सत्कार मंदिराच्या वतीने डॉ. दिपक दडमल यांच्या वतीने करण्यात आला. प्रा.मेश्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात श्री हनुमान चालीसा पठन कार्या बद्दल मंडळाला शुभेच्छा दिल्या तथा संकट समयी रक्षण करणारा शक्तिशाली पाठ म्हणजे श्री हनुमान चालीसा असा विश्वास सरांनी वेक्त केला. रक्षाबंधन उत्सव कार्यक्रम च्या शुभेच्छा देत त्यांनी भगवान श्रीकृष्ण व द्रौपदी यांचे असणारे बंधूप्रेम वेक्त केले व रक्षाबंधन या माध्यमातून प्रेम, आपुलकी, विश्वास व रक्षा यावर मार्गदर्शन केले.क्रांतिदिनी खडसंगी येथील रहवासी CISF जवान पंकज पंढरी श्रीरामे यांचा सत्कार मंदिराच्या वतीने प्राचार्य सदाशिवजी मेश्राम सर यांनी केला. तसेच करीत असलेल्या राष्ट्रसेवा व देशरक्षण कार्या बद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन कु. श्रीया अक्षयजोशी, पुणे यांचे वतीने स्व. प्रभाकर जोशी, चिमूर यांचे स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आला त्या बद्दल मंदिराच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी गावातील तसेच परिसरातील शेकडो बाल, युवा, जेष्ठ सदभाविक प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!