वटवृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा
वटवृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा
स्वाब संस्थेचा उपक्रम.
तळोधी (बा.):
'प्रकृतिः रक्षति रक्षिता'(ज्याने निसर्गाचे रक्षण केले, त्याचे निसर्ग रक्षण करतो!) हेच ध्येय मनात धरून स्वाब नेचर केअर फाउंडेशन परिसरात पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी धळपळत असते. या संस्थेद्वारे दरवर्षी वटवृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला जातो. विशेष म्हणजे नागपूर -मूल रोडवरील तळोधी पोलीस स्टेशन समोरील नवोदय विद्यालय च्या कॉर्नर वर तीनशे वर्षे पुराना एक वडाचा झाड आहे. काही वर्षांपूर्वी या हायवेचा काम सुरू असताना या वटवृक्षाला तोडण्यात येणार होते. मात्र स्वाब संस्थेच्या वतीने निवेदन देत मानवी शृंखला बनवून या वृक्षाचे रोडच्या कामाकरता तोडण्यापासून संरक्षण करण्यात आले होते . "या वृक्षाखाली गाव परिसरात जाणारे शेकडो प्रवासी या वृक्षाचा आसरा घेत उन्हाळ्यामध्ये बसची वाट पाहत असतात. त्यामुळे हा वृक्ष आम्ही असेपर्यंत कधीही तुटू देणार नाही व याचे सदैव संरक्षण करू!" या बेताने दरवर्षी रक्षाबंधनाला स्वाब संस्थेद्वारे स्वतः विविध रंगांच्या फुलांची सुंदर मोठी राखी बनवून बांधण्यात येते. त्या संदर्भात याही रक्षाबंधनाला संस्थेद्वारे राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.
यावेळेस तळोदी पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचारी व पत्रकार संघाला निमंत्रण देऊन ही राखी बांधण्यात आली. स्वाब संस्थेचे संपूर्ण सदस्य तळोदी बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गुहे, पि.एस.आय. चंद्रकांत लांबट, स्वाब संस्थेचे यश कायरकर, जीवेस सयाम, नितीन भेंडाळे, जिवन गुरनूले, गणेश गुरनुले, शुभम सुरपाम, शुभम निकेशर, आदित्य नान्हे, कैलास बोरकर,गोपाल कुंभले, महेश बोरकर ,अमीर करकाडे, हितेश मुंगमोडे, पत्रकार संघाचे परिमल मदनकर, संजय अगडे, कालेज च्या विद्यार्थीनी वैश्णवी अनिल बोरकर, नंदिनी रवी भंडारे, प्राजक्ता दिलीप राऊत,समीक्षा संजय शेंदरे इत्यादी विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!