युवतीची बदनामी करणाऱ्या युवकाला भिसी पोलीसांनी केली अटक
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमुर : - सातत्याने ३ वर्षांपासुन युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या व तिची बदनाम करणाऱ्या युवकाला भिसी पोलिस अधिकाऱ्यांनी अटक केली.युवकाच्या अटकेनंतर सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.नराधाम युवकांनी ९ ऑगस्टला युवतीचे अश्लील व्हिडीओ बनवून बदनामी करण्याच्या इराद्याने इंस्टाग्राम वर अपलोड केले होते.यामुळे पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन भिसी पोलीसांनी आरोपी युवकाला अटक केली.अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव राकेश कैलास चौधरी वय २२ वर्षे असे आहे. महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याअंतर्गत येत असलेल्या चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वाढोणा येथील राकेश कैलास चौधरी याचे गावातीलच एका १९ वर्षीय युवतीशी प्रेमसंबंध जुळले होते. सातत्याने ३ वर्षांपासुन सदर नराधाम युवक प्रेमाच्या नावाखाली युवतीवर अत्याचार करीत होता. या दरम्यान आरोपी युवकाने पिडीत युवतीला न सांगता तिचे अनेक अश्लील व्हिडीओ बनविले.या अश्लील व्हिडीओ चा धाक दाखवून आरोपी युवकाने पिडीत युवतीवर अत्याचार केला. व्हिडिओ अपलोड बाबत सदर बाब युवतीच्या लक्षात येताच युवतीने आपल्या पालकां सोबत येऊन आरोपी राकेश विरुध्द भिसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोंगाडे,सह. उपनिरीक्षक रविन्द्र वाघ व सह. उपनिरीक्षक थिटे यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत लगेच मौजा वाढोना गाठले व गावातून आरोपीला अटक केली.भिसी पोलीसांनी आरोपी विरूध्द बलात्कार, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!