शासकीय आश्रम शाळा जांभुळघाट येथील विद्यार्थ्यांवर तापाचे संकट

पालक वर्गाची शिक्षकावर नाराजी

आरोग्य केंद्र जांभुळघाट येथे तपासनी

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा जांभुळघाट येथील शासकीय आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांवर तापाचे संकट आल्यामुळे पालक वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.आज दि.११/०८/२०२५ ला जांभुळघाट येथील आरोग्य केंद्रा मध्ये अंदाजे १४० विद्यार्थी हे आजारावर उपचार करण्यासाठी आले असता काही विद्यार्थ्यांची तब्बेत जास्त हलावली असता सात विद्यार्थीना चिमुर येथे उप जिल्हा रूग्णलयात हलवण्यात आले आहे. मागीत चार-पाच दिवसा पासुन सतत विद्यार्थी  यांचे आजार वाढतच आहे. ताप,संडास,उलटी सारख्या आजरा ची सात शाळेत सुरू आहे.पालकांची अधिक्षक यांचेवर तिव्र नाराजगी पाहायला मिळाली.  पाणी किंवा जेवणा मुळे विद्यार्थी वर आजार चा संकट आलेले आहे.अश्या प्रकारची पालक वर्गा सांगण्यात येत आहे.आमचे मुले आम्ही उपचारा साठी घरी घेऊन जातो पण अधिक्षक घरी नेण्यास नकार देत असल्याने अधिक्षका वर एक प्रकारचा राग पालक वर्ग करीत आहे.  प्रकल्प अधिकाऱ्याणी शासकीय आश्रम शाळे भेट देऊन सर्व विद्यार्थी व शाळे परस्थितीचा पाहणी करूण रेफर विद्यार्थीना चिमुर उप जिल्हा रूग्णालय येथे पाठवण्यात आहे. पेण्याच्या पाण्याचे  श्याम्पल तपासनी साठी पाठवण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!