अवैध देशी दारु विक्री करताना पकडले;

 अवैध देशी दारु विक्री करताना पकडले;



तळोधी (बा.) नागभिड पोलिस स्टेशन अतंर्गत पळसगाव खुर्द येथे अवैध देशी दारू विक्री करताना दिवाकर डाहारे यांचें घराची झडती घेवुन १५ देशी बाटली जप्त करण्यांत आली.

        सदर गावांत महिलांनी अवैध दारु विक्री विरोधात एल्गार पुकारला होता दरम्यान सहा ते सात महिने कोणीही दारु विक्री केली नाही. त्यामुळें गावांत शांतता व सुव्यवस्था होती. मात्र झुप्या मार्गानें हळुच दारु विक्री करण्यांत येत असल्याची चाहुल लागल्याने नागभिड येथिल सा.पो.नि. पानसे, पोलीस शिपाई गुरुनुले यांनी घरांची झडती घेत अवैध दारु जप्त केली. पोलिस पाटील प्रविण रामटेके, मिलिंद मेश्राम, प्रियंका शेंडे  यांचें उपस्थित ही कार्यवाही करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!