ग्रामीण भागातील महिला मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात!

 ग्रामीण भागातील महिला मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात!



तळोधी (बा.) बातमीदार:-

      नागभीड तालुक्यातील अनेक मायक्रो फायनान्स बँका म्हणजेच कि सूक्ष्म वित्त बँका आहेत या सूक्ष्म वित्त बँकाणी शहरी व ग्रामीण भागातील बचत गटांना अशी सवय लावलीय कि अनेक महिला यात कर्ज बाजारी पणाच्या संकटांना सामोरे जात आहेत. या मायक्रो फायनान्स मुळे अनेक ग्रामीण भागातील गोर गरीब घटका मोजत मोजत भरणा करीत आहेत परंतु जर का एखाद्या वेळेस शिवीगाळ, धमकी, घरी येऊन बसने हा प्रकार बऱ्याचदा बघायला मिळतो.

ग्रामीण भागातील महिलांनी मजुरीच्या पैशातून बचत कशी होईल महिलांचे सक्षमिकरण होऊन त्या स्वतःच्या पायावरती उभ्या वाव्यात हा मुख्य उद्देश होता. आणी गेल्या कोरोना च्या महामारी नंतर मात्र बचत गटावरती काळाचा घाला झाला कि बचत गट हे बंद होण्याचा मार्गांवरती आहेत.

मायक्रो फायनान्स कंपन्या तीन ते आठ महिला यांचा समूह तयार करतात आणी त्यांना सूक्ष्म वित्त देण्यास सुरवात करतात तर सुरवातीच्या काळात वीस हजार ते तीस हजार पर्यंत लोन दिल्या जातो. ज्या महिलांच्या घरी गट तयार होतो त्यांना पाचशे ते दोन हजार पर्यंत कमिशन हे ठरलेले असते काही महिला स्वतःच्या नावावरील लोन दुसऱ्यांना वापरण्यास देतात त्यातून त्यांना हजार दोन हजार मिळतात. एक कर्ज संपले कि दुसरा लगेच देण्यात येतो त्यात वाढीव रक्कम सुद्धा मिळत जाते त्याच नादाने रक्कम ही वाढत गेली आणी बचत ही शून्य होत आली यामुळे ग्रामीण भागातील बचत गटावरती मायक्रो फायनान्स चा प्रभाव हा १००%पडलेला दिसतो आहे. मायक्रो फायनान्स चे व्याजदर सुमारे २२% ते २४% व्याज दराने घेतलेली रक्कम ही पंधरवाडी /महिनेवारी मध्ये परत करावी लागते जर भरणे होत नसेल तर बऱ्याच प्रकारणा मध्ये घात अपघात सुद्धा बघायला मिळतात कर्जबाजारी पणाचे संकट हे कधी टळेल आणी ग्रामीण भागातील बचत गट हे पुन्हा एकदा पुनर्जीवीत होतील अशी अशा आहे.


      👉🏿कोट: मायक्रो फायनान्सच्या  जाळ्या मुळे ग्रामीण भागातील महिला बचत गट बंद होण्याच्या मार्गावर दिसत आहे. दरमहा किंवा आठवड्याच्या व्याजदर 24 % असतो. ज्यादा व्याजदारामुळे ग्रामीण भागातील माहिला जास्त कर्जबाजारी होत असल्याचे चित्र दिसत आहेत.वित्त बँकांनी बचत महिलांसाठी कर्जाचा पुरवठा करावा.

        परिमल मदनकर सामाजिक कार्यकर्ता

            तळोधी (बा) ता. नागभीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!