सनातन संस्था न्यासातर्फे खाऊ वाटप उपक्रम संपन्न

  


समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत  सनातन संस्था या न्यासातर्फे बुधवार दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी सौ.मिरा बाई नरुले यांच्या घरी, वार्ड क्र.०१ मुल,येथे खाऊ वाटप करण्यात आला. 

          सनातन संस्था या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे,याविषयी प्रबोधन असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. 

             गरजूंना मदत व्हावी हा उद्देश लक्षात घेऊन न्यासाने या उपक्रमाचे आयोजन केले होते .

               सनातन संस्था या न्यासाच्या वतीने सौ. अर्चना येनूरकर, श्रीमती पूनम नरुले आणि सौ. गिता कोंतमवार यांनी परिश्रम घेतले.

      या उपक्रमाचा लाभ ३५ लाभार्थ्यांनी घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!