मंजूर रस्त्याचे अतिक्रमण हटवून रस्त्याचे सुरळीत बांधकाम करा
ताजने यांची ग्रामपंचायतला निवेदनातून मागणी
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत शेगाव असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत कडुन विकास कामे करण्यात आली आहे.
पावसाळ्यात गावातील रस्ते मात्र अनेक ठिकाणी खराब असल्याने नेहमीच नागरिकांना वाहतूक करण्याकरीता अडचणी निर्माण होत असते शेगाव ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत असून या ठिकाणी विविध योजनेतून विकास कामाकरीता लाखो रुपयाचे निधी येत असुन या ठिकाणी पीडब्ल्यूडी मार्फत शेगाव मध्ये रस्ता मंजूर झाला आहे हा रस्ता बांधकाम करत असताना दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढून रस्ता बांधकाम व्यवस्थित करण्याचे निवेदन ग्रामपंचायतला शिवनंदन ताजने यांनी दिले आहेत, पीडब्ल्यूडी मार्फत मंजूर रस्ता हा सहा मीटरच्या वर असून यामध्ये सिमेंट काँक्रेट रस्ता तसेच दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम करायचे असुन काम सुरू करण्याच्या अगोदर कोणत्याही प्रकारे ग्रामपंचायत कडून अतिक्रमण काढण्यात आलेले नाही, रस्त्यावर ठेकेदाराकडून काळी गिट्टी टाकण्यात आलेले असल्याने या ठिकाणी वाहतूक करताना मोठ्या प्रमाणात जनतेला त्रास सहन करावा लागत असल्यामुळे ग्रामपंचायत ने अतिक्रमण काढून रस्त्याचे सुरळीत बांधकाम करण्याची मागणी निवेदनातुन शिवनंदन ताजने यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!