माजी विद्यार्थिनीचे जिल्हा परिषद शाळेला संगणक सेट भेट

जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेत उच्च पदावर गेलेल्या विध्यार्थिनी कडुन समाजाला एक संदेश

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - ग्रामीण तसेच शहरी भागातील पालकांना आपले मुले कॉन्व्हेंट मध्ये टाकायची चढा ओढ सुरु असुन या मध्ये जिल्हा परिषद शाळा मध्ये मुलांची संख्या सध्या कुठेतरी कमी होत चाललेली आहे.जिल्हा परिषद शाळेतूनही शिक्षण घेत पुढे जाऊन उच्च पद प्राप्त करता येते हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव ( बु.) या शाळेतील माजी विद्यार्थिनी कु. करिश्मा अशोक निखारे, शेगाव ( बु. नियुक्ती  प्रकल्प अधिकारी, अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग, अमरावती  हिने दाखवून दिले आहे.
करिष्मा हिने आपल्या मिळालेल्या प्रथम पगारातून  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव (बु) पंचायत समिती वरोरा या शाळेकरीता संपूर्ण एक संगणक युनिट सामाजिक बांधिलकी जोपासत बक्षीस म्हणून दिले कु.करिश्मा निखारे हिने शेगाव बु. शाळेतील तिचे बालपण, आपल्या भावना, आपली कौटुंबिक परिस्थिती, आपले ध्येय,जीवनातील कठीण संघर्ष हे सगळे  विद्यार्थ्यांसोबत  यावेळी व्यक्त केले. तिने शाळेतील १४७  विद्यार्थ्यांना पेन पाउच, पेन्सिल, खोडरबर , शाँपनर दिले. जि.प.शाळेच्या वतीने करिश्मा चे अभिनंदन, आभार या शाळेचे रवींद्र साखरकर, सर मुख्याध्यापक यांनी मानले.एकंदरीत तिचा संघर्षमय जीवन प्रवास आज मिळालेल्या यशातून जिल्हा परिषद च्या शाळेतून शिकक्षण घेतलेले विध्यार्थी सुद्धा उच्च पदावर जाऊ शकते हे या वेळेला तिने सर्व विद्यार्थ्यांना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!