बालाजी विद्यानिकेतनमध्ये जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सव साजरा

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक.१६/०८/२०२५ येथील बालाजी विद्यानिकेतनमध्ये १६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरांविषयी आदरभाव वाढावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सकाळपासूनच शाळेचे प्रांगण भक्तिमय वातावरणाने भारले होते. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी श्रीकृष्ण आणि गोपिकांच्या वेशभूषेत शाळेत प्रवेश केला. विद्यार्थ्यांनी पिवळ्या धोती-कुर्त्यावर बासरी,मुकुट आणि मोराचे पीस धारण केले. तर विद्यार्थिनींनी रंगीबेरंगी लेहंगे आणि पारंपरिक दागिने घालून राधा - गोपिकांचे प्रतिरूप साकारले.कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षक सेलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय भजन आणि अभंग सादर करून करण्यात आली. त्यानंतर, उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेली दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मुलांनी मानवी मनोरा तयार करून दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला.दहीहंडीनंतर, सर्व विद्यार्थ्यांनी गोपाळकाल्याचा आस्वाद घेतला. दही, पोहे आणि इतर पदार्थांचे मिश्रण असलेला हा पारंपरिक प्रसाद सर्वांनी मनसोक्त ग्रहन केला.हा कार्यक्रम केवळ मनोरंजनाचा भाग नव्हता, तर विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध सांस्कृतिक मूल्यांशी जोडल्या गेले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक विवेक जुमळे, पर्यवेक्षिका जयश्री सावरकर,शिक्षिका पंधरे, लिखार आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!