शेगाव बु येथे पहिल्यांदा झेंडा वंदनाचा मान रिटायर होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला

गावातील सगळ्या शाळा पोलीस स्टेशन येथे एकत्र येऊन देतात राष्ट्र ध्वजाला मानवन्दना

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
 
वरोरा : -  79 वा स्वतंत्र दिवस निमित्त राष्टध्वजला  मानवंदना शेगाव बु या गावातील पोलीस स्टेशन मध्ये  राष्ट्रध्वजला मानवंदना देण्यात आली. विशेष या वर्षी पहिल्यांदा ठाणेदारांच्या हाताने राष्ट्रधवाजाचे प्रत्यरोपण  नं करता ३० आगस्ट ला आपल्या कर्त्याव्यातून मुक्त होणाऱ्या एक पोलीस अधिकाऱ्याच्या हातून करण्याचा मान शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांनी दिली आहे, शेगाव पोलीस स्टेशन कार्यरत कर्मचारी तसेच 31 आँगस्टला रिटायर्ड होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक दिवाकर मारोती ढोक यांना देण्यात आला आहे.
आज शेगाव चे ठाणेदार यादव यांचा वाढदिवस होता तरी त्यांनी शेगाव बु पोलीस स्टेशन च्या इतिहासात पहिल्यांदा असा स्वतः ठाणेदारांनी स्वतः हा मान दुसऱ्या अधिकाऱ्याला दिल्याने सगळ्यानी त्यांचे कौतुक केले व ढोक यांना सुद्धा येणाऱ्या निवृत्ती साठी शुभेच्छा दिल्या. त्या वेळी गावातील माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक,, सर्व 7 ही  अंगणवाड्यातील विध्यार्थी, उच्च प्राथमिक शाळा चे विद्यार्थी, नॅशनल इंग्लिश स्कुल चे विध्यार्थी, सावित्रीबाई फुले शाळा चे विध्यार्थी, व नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चे विद्यार्थी तसेच सर्व शाळा चे शिक्षक, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!