जांभुळघाट येथील पोष्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळेचे ६० ते ८० टक्के विद्यार्थी व विद्यार्थिंनी परतले घरी
असुविधांचा कळस
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोक उईके हे जांभुळघाट आश्रम शाळेला भेट देणार काय?
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चंद्रपूर जिल्ह्याअंतर्गत चिमूर तालुक्यात मौजा जांभुळघाट येथे पोष्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळा आहे.या निवासी शाळेत ५३८ विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यिंनी सन २०२५ ते २०२६ या शैक्षणिक सत्रात शिक्षण घेण्यासाठी राहात आहेत.मात्र,दिनांक ८ व ९ आगष्टला जांभुळघाट येथील पोष्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना भोजन करण्यासाठी रात्रोच्या वेळी शिळे अन्न दिल्या गेल्याने २६७ विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालावली होती.
काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले होते तर काही विद्यार्थ्यांना जांभुळघाट आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले होते.
शिळ्या अन्नातून झालेल्या विषबाधेचा घटनाक्रम येवढा भयानक होता की,विद्यार्थ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनात भितीचे सावट निर्माण झाले.यामुळे निवासी राहात असलेल्या ६०ते ८० टक्के विद्यार्थ्यांनी पोष्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळा जांभुळघाटला सोडले व स्वतःच्या घरी परतले.
विद्यार्थ्यांना शिळ्या अन्नातून विषबाधा झाल्यानंतर हे प्रकरण बाहेर पडू नये म्हणून स्थानिक मुख्याध्यापक,अधिक्षक,स्वयंपाकी यांनी विद्यार्थ्यांना धाकदपट करून विषबाधेचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता.
पण,निवासी विद्यार्थ्यांना असुविधांचा अती त्रास होत असल्याने त्यांनी या बाबत पालकांना सांगितले.पालकांनी आश्रम शाळा जांभुळघाटला गाठले व संबंधितांसी प्रत्यक्ष संपर्क केला आणि असुविधांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
परंतु विषबाधा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या पालकांसोबतच अधिक्षक,मुख्याध्यापक आणि इतरांनी हुलडबाजी केली असल्याचे प्रकरण अंगावर काटा आणणारे होते.याचा अनुभव पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुध्दा प्रत्यक्ष आलाय..
जांभुळघाट येथील पोष्ट बेसिक शासकीय निवासी आश्रम शाळा हे आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येत असली तरी या विभागाचे वरिष्ठ अधिकारी या शाळेतील असुविधांकडे दुर्लक्ष करीत होते असे दिसून येते आहे.
या शाळेत विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळत नाही,झोपायला योग्य गाद्या मिळत नाही,पोटाला ताजे अन्न मिळत नाही,खुल्या वातावरणात राहायला व शिकायला मिळत नाही,अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी काय करावे? याबाबत चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना.अशोक उईके हे विद्यार्थ्यांच्या सर्व आवश्यक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणार काय?
आणि शिळे अन्न खाण्यासाठी बाद्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कायमचे घरी बसवतील काय?हा ज्वलंत प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
खूप मोठ्या प्रमाणात अनियमित पणा चालतो. याकडे वरिष्ठांचा पैसे घेऊन कानाडोळा केल्या जात आहे. वरिष्ठ अधिकारी वर्गाचा आशीर्वाद लाभतो यांना प्रत्येक कामात कट दिल्या जाते.
उत्तर द्याहटवा