अषित प्राथमिक शाळेत ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक.१५ ऑगस्ट पवनी येथील स्थानिक अषित प्राथमिक शाळेत ७८ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.महाराष्ट्र ग्रामीण विकास शिक्षण संस्था,खांबाडी बोरगावचे कोषाध्यक्ष भीमराव वाहने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सुजाता गजभिये,प्रथम सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रत्नमाला रामटेके,विद्याताई मोटघरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रंजित शिवरकर,सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी संतोष धांडे,सामाजिक कार्यकर्त्या प्रियंकाताई मयूर,पुरुषोत्तम रामटेके तसेच शाळेचे मुख्याध्यापक राकेश बिसने यांची प्रमुख उपस्थिती होती.ध्वजारोहणानंतर सामुहिक राष्ट्रगित व राज्य गित गायन केले.तदनंतर शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम संगीत कवायतीने उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमात शाळेतील माजी विद्यार्थी हलचल दडमल आणि रेशमी शहारे यांचा माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत नैपुण्य मिळवून शिष्यवृत्तीधारक झालेल्या अंश कुंभरे याचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक राकेश बिसने,विद्यार्थी आयुष गिरडकर आणि माजी पालक मंगलदास राऊत यांचा वाढदिवस देखील उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रयागराज भोयर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक मुरलीधर जिवतोडे,संगीता ढेंगरे, अंगणवाडी सेविका विजुमाला साखरकर, करुणा वाघमारे,सविता राऊत,मंगला लोखंडे, सत्यभामा वाघमारे, धनश्री मुंडले,प्रमिला बिसने,अक्षय भोयर तसेच सर्व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमाला निमंत्रीत पालक,स्थानिक नागरिक आणि व्यवस्थापन समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!