चारगाव बू येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान संपन्न...

चारगाव बू येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान संपन्न...

वरोरा...
महसूल सप्ताह निमित्त 4 आगस्ट रोजी तहसील कार्यालय वरोरा अंतर्गत येत असलेल्या चारगाव बुद्रुक येथे श्री संत नानाजी महाराज देवस्थान येथे ' छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ आयोजित करण्यात आले होते या अभियान कॅम्पमध्ये नागरिकांना विविध दाखले इतर शासकीय प्रमाणपत्रे शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
शिबिरामध्ये पुरवण्यात येणाऱ्या सेवा जातीचे प्रमाणपत्र, रहवासी दाखले, फेरफार ,संजय गांधी निराधार योजना ,शेतकरी ओळख क्रमांक काढणे ,महसूल विभागाच्या विविध सेवा, उत्पन्न प्रमाणपत्र ,सातबारा, शिधापत्रिका वाटप, आधार कार्ड अद्यावत करणे ,पी एम किसान नोंदणी, विविध शासकीय योजना यांचा समावेश होता.
 तहसीलदार योगेश कौटकर वरोरा यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश वायदुळे सरपंच चारगाव (बु) राजेंद्र चिकटे माजी सभापती प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते तसेच छगन अडकिने, मधुकर भलमे ,विठ्ठल तुराणकार, रामदास डाहूले ,विद्याताई तुराणकार ,शालू ताई भलमे, प्रकाश दडमल ,भालचंद्र थूल (पो. पा. राळेगाव) राजेंद्र थूल (पो. पा. चारगांव बू) मंडळ अधिकारी अजय निखाडे(शेगाव बु) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारगाव ( बु) तलाठी यांनी केले.
कार्यक्रमाला शेगाव मंडळातील तलाठी, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच विद्यार्थी यावेळी उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!