चिमूर आगाहाची बस पलटी झाल्याने एक ठार,अनेक प्रवासी जखमी... चारगाव बु.जवळील घटना...

चिमूर आगाहाची बस पलटी झाल्याने एक ठार,अनेक प्रवासी जखमी...
चारगाव बु.जवळील घटना...



 वरोरा, चिमूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर चारगाव (बु) जवळील नदीच्या पुलाजवळ राज्य परिवहन विभागाची चिमूर आगाराची बस  चिमूर,चंद्रपूर ही बस आज दुपारी चिमूर वरुन एम एच 40 ये क्यू6181नं बस चंद्रपूरला जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारगावं बु. जवळ असलेल्या नाल्यात सुमारे १० फूट खोल खड्ड्यात गेली असून त्यामध्ये अनेक प्रवासी जखमी झालेले आहे, बस मध्ये अंदाजे 35 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे,अपघात होताच बस अपघाताच्या आवाजाने आजु बाजूला शेतात काम करणारे शेतमजूर, शेतकरी यांनी धाव घेऊन जखमींना वाहनाच्या बाहेर काढून शेगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क करत जखमींना खाजगी वाहनाने  उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. बस चालक सुनील पुसनाके यांना मिरगी येत असल्याची प्राथमिक माहिती उपस्थितांकडून मिळाली तसेच बसचा वाहक सुरेश भटाळकर हा गंभीर जखमी असून उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शेगाव परिसरातील गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी गर्दी  केली होती तसेच शेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन  स्थानिकांच्या मदतीने जखमींना वाहणाच्या बाहेर काढण्यासाठी मदत करीत होते. वृत्तलीहीपर्यंत वाहनातील जखमींची नावे कळु शकली नाही प्राप्त माहिती नुसार एकाची उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!