तलाठी की वसुली अधिकारी? निफंद्रा तलाठीवर तहसीलदाराची मेहरनजर .. @ बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर नोकरी मिळविल्याचा संशय

सावली (विजय कोरेवार) 

सावली तहसीलदाराचे हस्तक म्हणून ओळखले जाणारे निफंद्रा येथील तलाठी शंकर गाडे हे आपल्या साज्यातील तलाठीचे काम कमी मात्र तालुक्यात वसुली करण्याचे काम जास्त करीत असल्याची चर्चा असून वसुली अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यातच तलाठी पदासाठी दिव्यांग आरक्षणातून नियुक्ती झाल्याने बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकवाल्याची शंका व्यक्त केली जात असून काहींनी तक्रार केल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.       

🧒साज्याबाहेर कारवाई करण्याचा विशेष अधिकार बहाल

निफंद्राचे तलाठी शंकर गाडे यांनी आपल्या साज्याचा बाहेरील अंतरगाव तलाठी साजा येथे जाऊन शेतातील पाळीचे काम करणाऱ्या शेतकऱ्यास दमदाटी देत ट्रॅक्टर जप्तीची कारवाई केली. मात्र गावातील लोकांनी शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याने त्यांचे पाठीशी राहून आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडे तक्रार दिली. आमदार महोदयानी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार व तलाठी यांना चांगलेच धारेवर धरले त्यामुळे ट्रॅक्टरवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. शेतकऱ्यांना शेतातील पाळी दुरुस्तीचे काम असो की तलाव खोलीकरण असो त्या ठिकाणी जाऊन कारवाई करणारच. गाडे तलाठीला साज्याबाहेर जाऊन कारवाई करण्याचा अधिकार तहसीलदार यांनी बहाल केल्याची प्रचिती येत असून या प्रकरणानंतर तहसीलदार व तलाठी यांच्या कारनाम्यांची चर्चा आहे.

💰 तहसीलदारच्या मर्जीतील वसुलीबाज तलाठी गाडे

सावली तालुक्यात ज्या घाटातून रेती चोरी केल्या जाते तेथील तस्करांसोबत तहसीलदार यांचे आर्थिक संबंध आहेत. त्यामुळे बिनबोबट खुलेआम रेती तस्करी सुरु आहे. तस्करांकडून महिन्याकाठी आर्थिक रसद पुरविल्या जाते ही रसद जमा करण्याची जबाबदारी तलाठी गाडे यांचेकडे असल्याची माहिती येत आहे. आपल्या वसुलीच्या कर्तव्यात इमानदार व्यक्ती आवश्यक असतो व तो व्यक्ती तहसीलदार यांना शंकर गाडेच्या रूपात मिळालेला आहे. तलाठी गाडे बेकायदेशीर कामे करण्यास तरबेज असल्याने तालुक्यातील वसुली करूनही त्याचेकडे निफंद्रा साज्यासह विहीरगाव साजाची प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. 

🧑‍🦽 बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचे आधारे नोकरी मिळविल्याची चर्चा

निफंद्रा येथील तलाठी शंकर गाडे यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून अपंग आरक्षणातून नोकरी मिळविल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे. मात्र कोणत्याच प्रकारे दिव्यांग दिसत नसल्याने बनावट बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरीं मिळविली असेल अशी चर्चा आहे. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासनाची दिशाभूल केल्याची तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र तहसीलदार सावली यांचाच आशीर्वाद असल्याने कारवाई कोण करणार. सावली तहसीलदार प्रांजली चिरडे व तलाठी शंकर गाडे यांच्यावर कारवाईची मागणी मात्र जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!