साडे आठ फुटाच्या अजगराला स्वाब संस्थेचे जीवदान.


(चालू वर्षात तळोधी, नागभीड, सिंदेवाही, वनपरिक्षेत्रातून 17 अजगरा सह, शेकडो विषारी, बिनविषारी सापांना संस्थेचे जीवदान)
तळोधी (बा.):
      वैजापूर गावात तलाव लागत, घरालगत असलेल्या एका झाडाच्या साडे आठ फूट लांबीच्या व 11 किलो वजनाचे अजगराला स्वाब बचाव दल ने सुरक्षित रेस्क्यू करून सिंदेवाही वन परिक्षेत्रातील कच्चेपार जंगलातील सिंदबोडी तलाव परिसरात जंगलात सोडून जीवदान दिले.
 सविस्तर वृत्त असे की, वैजापूर गावात तलाव लागत, घरालगत असलेल्या एका झाडाच्या साडे आठ फूट लांबीचा अजगर साप असल्याचे लोकांच्या निदर्शनास येतात त्यांनी संस्थेचे बचाव दल प्रमुख जीवेस सयाम यांना या बाबतीत माहिती दिली. 
             यानंतर स्वाब चे बचाव दल प्रमुख सर्पमित्र जिवेश सयाम, नितीन भेंडाळे,गणेश गुरनुले,आदित्य नान्हे यांनी अजगराला सुरक्षित पकडून नंतर गांवकरी यांना अजगरा बद्दल माहिती दिली, माहिती सांगताना  बिनविषारी अजगर आणि विषारी घोणस यांच्यामधील फरक समजून सांगितला.  "गावालगत तलाव परिसर आणि जंगल असल्याने हा साप स्वतःला सुरक्षित ठेवण्याकरता झाडाच्या ढोलेमध्ये शांतपणे विसावा घेतात आहे. आणि अजगर साप हा घोणस प्रमाणेच थोड्याफार प्रमाणात दिसत असल्यामुळे बहुतांश लोक त्याला विषारी घोणस समजून मारून टाकतात. यामुळे या सापांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आता अजगर हा संरक्षित प्राणी असून तो 'शेड्युल वन' मध्ये येत असल्याने त्याला वाचवणे गरजेचे आहे  त्यामुळे अजगराला मारणे चुकीचे आहे. तो अत्यंत कमी संखेत असल्यामुळे असा कुठलाही साप दिसला तर वन विभागाला किंवा आम्हाला कळवा, मारू किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका." असे गावकऱ्यांना स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख सर्पमित्र जिवेश सयाम यांनी सांगितले. 
   या अजगराची नोंद तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्रात करून सिंदेवाही वन परिक्षेत्रातील कच्चेपार जंगलातील सिंदबोडी तलाव परिसरात जंगलात सोडून जीवदान दिले.
यावेळी वनरक्षक ऋषी जावाडे , स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख सर्पमित्र जिवेश सयाम, व अध्यक्ष यश कायरकर, शिक्षण विभाग प्रमुख नितीन भेंडाळे, संस्थेचे पदाधिकारी सर्पमित्र, गणेश गुरनुले,आदित्य नान्हे, शुभम निकेशर, उपस्थित होते.
 "थंडीच्या दिवसात उब घेण्याकरिता घोणस सारखे साप बाहेर पडून रस्त्यावर, मोकळ्या जागेत व घराचे आसपास येतात, सावधानता बाळगावी,  जर घर परिसरात साप आढळल्यास घाबरून जाऊ नये व त्या सापाला मारण्याऐवजी सर्पमित्रांनाच प्राचारण करावे. सर्प दंश झाल्यास कोणत्याही मांत्रिका कडे जाऊन आपला जीव गमावण्याऐवजी शासकीय रुग्णालयात जाऊन औषधोपचार करावा. (सापाचा जहर प्रतिरोधक) अँटिस्नेकव्हेनन्स घ्याव्या. असे या संदर्भात यश कायरकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!